22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeपरभणीइंधनाचे दर कमी करण्यासाठी भाजयुमोचा आंदोलनाचा इशारा

इंधनाचे दर कमी करण्यासाठी भाजयुमोचा आंदोलनाचा इशारा

एकमत ऑनलाईन

मानवत (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने सलग दोनदा इंधनाचे दर कमी केले. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही तत्काळ इंधनाचे दर कमी करावे, अशी मागणी मानवत तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे करण्यात आली. या संदर्भातील निवेदन मानवत तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्रांना पाठवण्यात आले. यावेळी महविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा बाजी करण्यात आलीÞ.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसकिंमती कमी केल्या आहेत. त्या प्रमाणे महाविकास आघाडी सरकारने सुद्धा तत्काळ इंधन दरवाढ कमी करावी. अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलं आहे. निवेदनावर भाजप युवा मोर्चाचे मानवत तालुकाध्यक्ष राजेश कच्छवे, जिल्हा सरचिटणीस महादेव कोल्हे पाटील, जिल्हा चिटणीस शिवाजीराव बोचरे पाटील, भाजपचे तालुका संघटन सरचिटणीस हरिभाऊ निर्मळ पाटील, भाजपचे युवा शहराध्यक्ष संदीप हंचाटे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष उद्धवराव काळे पाटील, भाजयुमोचे रवी वाघमारे, सोशल मीडिया प्रमुख श्रीकांत माकुडे, भाजपचे मानवत तालुका उपाध्यक्ष विष्णू होंडे पाटील, राम कच्छवे, गोपाळराव काळे पाटील, रयत क्रांति संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष मधुकरराव आवचार पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या