30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीसरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन

सरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पीटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे.या सर्व घटनेचा निषेध म्हणून परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी भाजपा महानगर व महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले.

महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या मा.मुख्यमंत्री यांना महिला मोर्चाच्या वतीने भेट म्हणून बांगड्या पाठविण्यात आल्या. महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिक-यांची भेट घेवून महिलांवर अत्याचार करणा-या नराधामांना कडक शिक्षा करण्यात यावी,महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या दुदेर्वी घटनांची मालिकाच चालू आहे. सरकारला महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे त्यामुळे पुन:पुन्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना राज्यात घडत आहेत. अशा वेळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तधारी पक्ष महिलांसाठी कुठे आवाज उठवताना दिसत नाहीत किंवा त्यांच्या सरकारला जाब विचारत नाहीत हे धक्कादायक आहे.

बलात्काराच्या घटनांचाही राजकारणासाठी सोईस्कर वापर करण्यात येत आहे हे निषेधार्ह आहे. राज्यात घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनेबद्दल सरकारच्या विरोधात महिलांवर्गाच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे यामुळेच आज परभणी महानगर मधील महिलांच्या वतीने सरकारचा आंदोलन करून निषेध करण्यात येत आहे. अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी गांभीयार्ने पार पडली पाहिजे .महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत व कडक कायदे त्वरित बनविण्यात यावे हे गरजेचे आहे.
यावेळी परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जि.प.सदस्य राजेश देशमुख,प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी,जालना जिल्हा महिला मोर्चा प्रभारी तथा मनपा गटनेत्या सौ.मंगल मुदगलकर, मनपा सदस्य मोकिंद खिल्लारे,मधुकर गव्हाणे,नंदकुमार दरक, विस्तारक अ‍ॅड.एन.डी.देशमुख, संजय शेळके, भाजपा सरचिटणीस संजय रिझवानी, दिनेश नरवाडकर, भाजपा तालुकाध्यक्ष संदिप जाधव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, महिला मोर्चा पदाधिकारी छायाताई मोगले, माधवी घोडके, गुलाबबी तांबोळी, पवार मामा, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, बाळासाहेब साबळे, संतोष जाधव, राहुल संघई आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाचा परभणीत रास्तारोको
राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असतांना राज्यातील आघाडी शासन कोणीही ठोस भुमिका घेत नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा आ. मेघनाताई बोर्डीकर यांच्या नेतृत्वात परभणीत जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. राज्यात गेल्या काही दिवसापासून महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे राज्यात महिला सुरक्षीत नाहीत महिलां संरक्षण देण्यासाठी राज्य शासनही लक्ष देत नसल्याने आज भाजपा पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रास्तारोको केले.

मराठा आरक्षणा प्रश्नी एकत्रीत लढा हवा अन्यथा ‘पानिपत’ अटळ : धैर्यशील मोहिते-पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या