28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeपरभणीदूध उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी १ ऑगस्ट रोजी भाजपचे आंदोलन

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी १ ऑगस्ट रोजी भाजपचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

मानवत : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी संकटात आला असून गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान तर दूध भुकटी करिता प्रति किलो ५० रुपये अनुदान शासना कडून ३० रुपये प्रति लिटर दुधाची खरेदी करण्यात यावी. या मागणीसाठी मानवत तालूका भारतीय जनता पार्र्टी व महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने दूध उत्पादक शेतकºयांच्या मागण्यासाठी १ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचा इशारा देण्यासाठी मानवत तहसिलचे नायब तहसीलदार यांना मानवत तालूका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे मानवत शहर अध्यक्ष संदीप हंचाटे भारतीय जनता पार्टीचे मानवत तालूकाध्यक्ष विशवनाथ लाडाने, भारतीय जनता पार्टीचे मानवत तालूका संघटन सरचिटणीस महादेव कोल्हे, हरिभाऊ निर्वळ , परमेश्वर पाटील पोंहडूळकर ,भाजप किसान सेल आघाडी मानवत तालूकाध्यक्ष सुभाष निर्वळ बाळा साहेब लाडाणे केकरजवळेकर , भाजप अनूसूचित जाती जनजाती सेलचे मानवत तालूकाध्यक्ष महादू कदम , विठ्ठल लाडाणे , कृष्णा टाकळकर, शेषराव राठोड अ‍ॅड. व्हि.एन.काळे, बाळासाहेब भंडारे आदीसह पदाधिकारी या वेळी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More  कोरोनाचा आकडा वाढतोय…धक्कादायक : ५० मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या