परभणी : शहरातील सिग्नल व्यवस्था बंद पडली असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहेÞ विशेषत: शहरातील महामार्गावर वाहतूक सिग्नल नसल्याने नागरीकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहेÞ रस्ता ओलांडताना अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत परंतू याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहेÞ त्यामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहेÞ सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरू न झाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी दिला आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, शहरातील वाढती लोकसंख्या व अरूण रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहेÞ शहरात अनेक वर्षांपुर्वी सिग्नल बसवण्यात आले होतेÞ परंतू काही दिवसानंतर हे सिग्नल लगेच बंद पडलेÞ त्यानंतर आंदोलन करताच ते पुन्हा चालू करण्यात आलेÞ लाखो रूपये खर्च करूनही सिग्नल बंद असल्याने नागरीकांच्या जिवाशी खेळ होत आहेÞ सिग्नल अभावी शहरातील बसस्थानक, वसमतरोड, रेल्वेस्थानक परीसरासह गावातील अनेक चौकात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहेÞ याबाबत वारंवार निवेदने देवूनही कुठलीच दखल घेण्यात आलेली नाहीÞ याकडे त्वरीत लक्ष देवून शहरातील सिग्न व्यवस्था सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहेÞ अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.