परभणी : राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपाने तीनही जागी विजय मिळविल्याबद्दल परभणीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करीत फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटप केले.
महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह मुख्य बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, संघटन सरचिटणीस अॅड. एन.डी. देशमुख, सरचिटणीस दिनेश नरवाडकर, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल,
उपाध्यक्ष मधुकर गव्हाणे, प्रशांत सांगळे, विजय गायकवाड, संजय कुलकर्णी, मंडळ अध्यक्ष सुनील देशमुख, रितेश जैन, विजय दराडे, ज्येष्ठ नेते विलास मामा चांदवडकर, अॅड. गणेश जाधव, संतोष जाधव, डॉ. मनोज पोरवाल, उमेश शेळके, सौ. विजया कातकडे, सौ. पुनम शर्मा, गणेश देशमुख, संजय जोशी, शिवाजी शेळके, निरज बुचाले, दिपक शिंदे आदी उपस्थित होते़