25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीरिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात भाजपाचे गो बॅक आंदोलन

रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात भाजपाचे गो बॅक आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मिळावा याकरिता आज परभणी तालुक्यातील पेडगाव येथे माजी आ.मोहन फड,भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम व महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात रिलायन्स गो बॅक आंदोलन करुन कंपनी प्रतिमात्क पुतळ्याचे दहन करुन कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

परभणी जिल्ह्यातील २ लक्ष ७२ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ३०० कोटी रुपयाचा पिकविमा देण्यास रिलायन्स विमा कंपनी टाळाटाळ करत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावी आंदोलन सुरू आहेत. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याला हक्काचा पिकविमा मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी राज्य सरकार व कंपनीच्या विरोधात लढा सुरुच ठेवणार आहे.

परभणी जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी पिकविम्यापासून वंचीत असताना जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे एकही लोकप्रतिनिधी या विषयात अवाक्षर बोलायला तयार नाहीत ही खेदाची बाब आहे असे जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच रहाणार आहे अशी माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली.

यावेळी आंदोलनात माजी आ.मोहन फड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम,महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे,विजयराव वरपूडकर,बाळासाहेब जाधव,जिल्हा उपाध्यक्ष माधव चव्हाण,अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्तराव साबळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,माऊली वाघ ,गिरी महाराज, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री माऊली कदम , कार्यक्रमाचे संयोजक गणेशराव देशमुख, पेडगावकर भाजपचे श्रीकांत गरड,सोपान कोल्हे, पवन देशमुख,संदीप देशमुख, अभय देशमुख, शेख युनूस, गणेश देशमुख, लाल माथा, राजेश्वर गायकवाड, विकी देशमुख, वैभव डांगे, पंडित देशमुख, तसेच यावेळी गावातील पिकविम्यापासून वंचीत राहिलेले शेतकरी बांधव व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या