23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home परभणी दुध दरवाढीसाठी भाजपाचा रास्तारोको

दुध दरवाढीसाठी भाजपाचा रास्तारोको

परभणी : कोरोना संकटात अडचणीत सापडलेल्या दुध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला सरसकट प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे, दुध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दुध खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर करावा या मागणीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली दि. १ ऑगस्ट रोजी जिल्हयात विविध ठिकाणी तर परभणी शहरातील उड्डाण पुलावर अहिंसक पणे रास्तारोको आंदोलन करुन राज्यसरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

राज्यातील तसेच परभणी जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील भाजप सरकारच्या काळात दुध उत्पादक शेतक-यांना प्रति लिटर प्रमाणे ३२ रुपये दर मिळत होता आता हाच भाव प्रति लिटर फक्त २२ रुपये मिळत आहे यामुळे शेतक-यांसमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे. या संकटातून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी मागील भाजप सरकार प्रमाणे महाविकास आघाडीच्या सरकारने दुध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला अनुदान व दरवाढ देवून शेतक-यांना दिलासा द्यावा.

यावेळी आंदोलनात परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मनपा सदस्य मोकिंद खिल्लारे, मधुकर गव्हाणे,मोहन कुलकर्णी,भाजपा पदाधिकारी संजय शेळके,संजय रिझवाणी, भीमराव वायवळ,दिनेश नरवाडकर,विजय गायकवाड, सुरेश भुमरे,अतिक पटेल,प्रदिप तांदळे, रामदास पवार,भालचंद्र गोरे,अँड.गणेश जाधव,आकाश लोहट,बाळासाहेब साबळे,संतोष जाधव,रोहित जगदाळे,आकाश पवार,आनंता गिरी,आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्यथा तीव्र आंदोलन करणार : आ.डॉ. रत्नाकर गुट्टे
गंगाखेड :परळी नाका गंगाखेड येथे, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.गुट्टे यांनी दूध उत्पादक शेतक-्यांच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपये दर व प्रति लिटर दहा रुपये अनुदान आणि दूध पावडर ला प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळण्यासाठी आंदोलन केले. राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रपक्षांनी 20 जुलै 2020 रोजी शेतक-याच्या दुधाला सरकारने 35 रुपये प्रतिलिटर भाव व 10 रुपये प्रति लिटर अनुदान तर दूध पावडरला 50 रुपये प्रतिकिलो अनुदान देण्याची मागणी केली होती. परंतु सरकारने निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे आज रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे मोफत दुधाचे वाटप व दूध रस्त्यावर टाकून सरकारचे लक्षवेधी निषेधाचे आंदोलन केले.

दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळाबाजार अशा विविध प्रश्नांमुळे शेतकरी मेकाकुटीला आला आहे. शेतक-यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. तरी माननीय मुख्यमंत्री यांनी या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता अनुदान तर दूध पावडर प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळावे अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, सुरेश दादा बंडगर, संदीप आळणुरे पाटील , कृष्णाजी सोळंके, हनुमंत मुंडे, शिवा पवार, इंतेसा सिद्दिकी, एकबाल चाऊस, उद्धव शिंदे, प्रताप मुंडे, जयवंत कुंडगीर, श्रीराम खांडेकर, लक्ष्मण सोडगीर अदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मानवत: येथे बाबासाहेब जामगे, उद्धवराव नाईक, डॉ.उमेश देशमुख, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
जिंतूर : येथे भाजप आ. मेघना बोर्र्डीकर जिल्हा उपाध्यक्ष डॉ पंडित दराडे महीला मोर्चा आध्यक्ष डॉ विद्यताई चौधरी,मंडळ अध्यक्ष ते प्रताप देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला.सेलू येथे शशिकांत देशपांडे ,दिनकर वाघ,अर्जुन बोरूळ, फुलारी राजवाडकर यांच्यासह सुरुवात पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पालम : तालुक्यात प्रदेश कायर्कारणी सदस्य गणेशराव रोकडे ,लिंबाजीराव मंडळ अध्यक्ष शिवाजीराव दिवटे गुरुजी श्री भागवत यांच्यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्णा : येथे बी.आर. देसाई,बळीराम कदम,बाळासाहेब कदम, हनुमान अग्रवाल मंडळ अध्यक्ष आनंदराव पारवे,बालाजी खैरे, विश्वनाथ सोळंके,नंदकुमार डुकर,कपिल कदम,शेळके यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ताडकळस येथे रस्ता रोको मध्ये रमेशराव गोळेगावकर,बालाजी रुद्रवार मनुकाका अंभोरे अंभोरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.परभणी दक्षिण मंडळात शिंगणापूर येथे मंडळ अध्यक्ष अरुण गवळी किसान मोर्चाचे अध्यक्ष बालाजी वानखेडे माजी तालुकाध्यक्ष यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More  दरवाढीसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow