22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeपरभणीपीक विम्यासाठी भाजपाची जोरदार निदर्शने

पीक विम्यासाठी भाजपाची जोरदार निदर्शने

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतक-यांना पीकविम्याची हक्काची रक्कम रिलायन्स कंपनी व राज्य सरकारने पेरणीपुर्व तातडीने वितरीत करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हा शाखेतर्फे मंगळवारी, दि.०८ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिका-यांनी जुना पेडगाव रस्त्यावरील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी काळे झेंडे व फलक आणले होते. हक्काचा पीकविमा दाबून ठेवणा-या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा धिक्कार असो, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, पीक विम्याची रक्कम द्या अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

जिल्हाध्यक्ष डॉ.कदम, बाळासाहेब जाधव, शिवाजीराव मव्हाळे, समीर दुधगावकर, बाळासाहेब भालेराव, सुरेश भुमरे, अप्पासाहेब कदम, बाळासाहेब शिंदे, राजेश बालटकर, नवनाथ सावंत, तुकाराम मुंडे, बापू मुंडे, गणेश मुंडे, तुकाराम वाळके, शिवसांब लांडगे, विशाल बलोटे, महेश बलोटे, लक्ष्मीकांत बंडेवार, हनुमंत मुंडे, शंभूदेव मुंडे, दामोदर तांदळे, दामोदर ठाकूर, सुशील रेवडकर, विश्‍वांभर थोरवे, हेमंत शिंदे, माऊली कदम, शामसुंदर जाधव, नामदेव जाधव, तुकाराम जाधव, कृष्णा जाधव, नंदकिशोर जाधव, राजाभाऊ राठोड, दत्तराव जाधव, श्रीकांत कदम, बाबुराव लांडगे, विठ्ठलराव जाधव, हरिभाऊ जाधव, वशिष्ठ जाधव, राम जाध.व, अर्जुन जाधव, सतीश जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अंगावरील शर्ट काढून संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधी व कृषी अधीक्षक कार्यालयाच्या अधिका-यांना दिले. या आंदोलनाने अधिकारी गांगरून गेले होते. त्यांना उपस्थितांना कोणतीही उत्तरे देता आली नाहीत.

सीरम, भारत बायोटेकला केंद्राकडून लसींची ऑर्डर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या