21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeपरभणीपक्षाने संधी दिल्यास बोबडे टाकळी सर्कलमधून निवडणूक लढवणार : पंढरकर

पक्षाने संधी दिल्यास बोबडे टाकळी सर्कलमधून निवडणूक लढवणार : पंढरकर

एकमत ऑनलाईन

परभणी : गेल्या १२ वर्षांपासून युवासेनेच्या माध्यमातून सक्रीय असलेल्या व प्रत्येक आंदोलनात सहभाग नोंदवत पक्ष वाढीसाठी युवासेना उपजिल्हा प्रमुख तथा सावंगी खुर्दचे सरपंच सुनील बालासाहेब पंढरकर यांनी प्रयत्न केला आहे़ तसेच सावंगी खुर्द ग्रामपंचायत सरपंच म्हणून त्यांनी आता पर्यंत ७० लाखांची विकास कामे केली आहेत़ तसेच ०१ कोटी ७० लाखांची कामे मंजूर झाली आहेत़ त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास आगामी पंचायत समिती निवडणूक बोबडे टाकळी सर्कलमधून लढवण्यास इच्छूक असल्याची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनिल पंढरकर यांनी दिली आहे.

परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्यापासून आ़डॉ़राहूल पाटील व मा़जि़प़सदस्य दिनेशराव बोबडे यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असल्याची माहिती पंढरकर यांनी दिली आहे़ खा़संजय जाधव यांनी देखील ३० लाखांचा निधी दिला आहे.

परंतू नुकत्याच सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने या कामांना स्थगिती आणली आहे़ याशिवाय सर्कलमधील बस, लाईट, रस्ता, नाल्या संदर्भात आ़डॉ़राहूल पाटील यांच्यासमोर वारंवार समस्या मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे़ सर्कलमधील समस्यांवर दिनेश बोबडे तसेच आमदार डॉ़पाटील यांच्या मदतीने मार्ग काढत विविध कामे पूर्ण केली आहेत़ खा़जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पक्ष वाढीसाठी कार्य केले असून पक्षाने देखील मला न्याय दिल्याने २३व्या वर्षी सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली असल्याचे पंढरकर यांनी आवर्जुन सांगितले.

याशिवाय पक्षाने २४व्या वर्षी युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड करून आपल्यावर मोठ्या कामाची जबाबदारी सोपविली असून आपण जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर युवासेना वाढीसाठी पूर्णत: प्रयत्न केले आहेत़ आ़डॉ़पाटील यांच्या माध्यमातून गावातील ४० नागरीकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहे.

याशिवाय जयंती, आरोग्य शिबीर, सामाजिक उपक्रमातून नेहमीच सक्रीय सहभाग नोंदवला आहे़ खासदार संजय जाधव व आमदार डॉ़राहूल पाटील यांचे हात मजबूत करण्यासाठी तसेच बोबडे टाकळी सर्कलच्या विकासासाठी पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छूक असून पक्षाने संधी दिल्यास या संधीचे सोने करणार असल्याची माहिती पंढरकर यांनी दिली आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या