25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीपरभणी शहरात दोन ठिकाणी घरफोडी

परभणी शहरात दोन ठिकाणी घरफोडी

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी शहरातील रामकृष्ण नगर व यशवंत नगरमध्ये घरफोडी केली असून यामध्ये चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे़ या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द नवा मोंढा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे़

शहरातील वसमत रोडवरील रामकृष्ण नगरमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी श्रेया देवदत्त देशपांडे यांनी तक्रार दिली आहे़ ३१ मे ते ०१ जून दरम्यान फिर्यादीच्या आईचे रामकृष्ण नगरमधील घर फोडून चोरट्यांनी चांदीचे दागिने, पितळेच्या वस्तू, सीसीटीव्ही कॅमे-याचा टिव्हीआर आणि रोख ४० हजार रूपये असा ०१ लाख १४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे़ घराच्या समोरील दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ त्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेले साहित्य लंपास केले़ या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि कवाळे करत आहेत़

दुसरी घरफोडीची घटना यशवंत नगर भागात घडली आहे़ या भागात राहणारे निलेश मारोती राठोड या शिक्षकाच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलसीडी टिव्ही़ सोन्याचे दागिने, रोख ३० हजार रूपये असा मुद्देमाल लंपास केला आहे़ या प्रकरणी निलेश राठोड यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोह़पवार करीत आहेत़ घरफोडीच्या घटनांमुळे शहरातील नागरीकांत भिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे रात्री पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरीक करीत आहेत़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या