22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeपरभणीकोरोना दवाखान्यात सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

कोरोना दवाखान्यात सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

पूर्णा : कोरोना रुग्णांच्या मृत्यूविषयी नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत असल्याने कोरोनाचा ज्या रुग्णालयात उपचार चालू आहे,त्या रुग्णालयात सी सी टिव्ही कॅमरे बसविण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत असून काही रुग्ण बरे ही होत आहे तर काही रुग्ण दोन दिवसात उपचारा दरम्यान मरण पावत आहे. त्यामुळे या मरण पावलेल्या रुग्ण बाबत त्याच्या नातेवाईकाना डॉक्टरच्या उपचारा बाबत शंका निर्माण होऊन चुकीचे इंजेक्शन देण्यात येत असल्याने रुग्ण मरण पावत असल्याची चर्चा ही जिल्हात सुरू आहे त्यामुळे परभणी व नांदेड जिल्ह्यातील आरोग्यखात्या बाबत नागरिका मध्ये संभ्रम पसरल्याने नागरिक रुग्णालयात जाण्याचे टाळत आहे.

त्या रुग्णालयात कोरोना रुग्णाचे उपचार करत असताना सर्वाना पाहता येईल या करिता कोरोनाच्या रुग्णालयात सी सी टीव्ही कॅमरा बसविण्यात यावे व त्याची छबी मॅनिटरवर(डिस्प्लेवर) बाहेर नातेवाईक व नागरिकाना लाईव्ह पाहण्यासाठी रुग्णालयात ठेवण्यात यावे जेणे करून कोरोना रुग्णाची तबियत कशी आहे व त्याचा उपचार डॉक्टर मंडळी कसे करतात हे पाहतील आणि या मुळे रुग्णाच्या मूर्त्यु बाबत पसरत असलेले संभ्रम दूर होऊन नागरिक आपोआप रुग्णालयात दाखल होऊन आपला उपचार करतील आणि कोरोनाचे रुग्ण कमी होईल. या निवेदना वर शेख इरफान शेख बाबू,शेख फजल शेख अफ़जल,मो.शफीक मो. रफिक,अ निसार अ सत्तार आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Read More  गंगाखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना गती द्या:आ.डॉ.गुट्टे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या