जिंतूूर : जिंतूर-औंढा महामार्गावरील भोगाव जवळ चार चाकी व दुचाकीचा अपघात झाल्याने यात दुचाकीस्वार व एक महिला असे दोन जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने या अपघातात दोन वर्षाच्या चिमुरडीला काहीही मार लागले नाही. ग्रामस्थ व नागरिकांनी जखमींना जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान ही घटना शनिवार दि. ६ रोजी ११.३० च्या सुमारास घडली. जिंतूर-औंढा महामार्गावरील भोगाव जवळील रस्त्यावर दुचाकीस्वार मनोज मोरे हे जिंतूर येथील रुग्णालयातून उपचार करून भोगावकडे एक महिला व बालिकेला घेऊन जात असताना ओढ्याकडून भरधाव वेगाने येणा-या चार चाकी वाहन क्र.एम. एच.१७-ए.जी. ५५२४ या वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार मनोज मधुकर मोरे(३०) भाग्यश्री मोरे (२५) हे दोन जण गंभीर जखमी झाले दरम्यान तेथे उपस्थित असलेले ग्रामस्थ शेख मुनाफ व इतर नागरिकांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
याठिकाणी डॉ. फराज खान, सिस्टर वर्षा हरकळ, सिस्टर मनीषा देशमाने, नागेश अंकात आदींनी प्राथमिक उपचार केले असता मनोज मोरे यांच्या पायाला व हाताला गंभीर जखम झाली. तर भाग्यश्री मोरे यांनाही गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या आपघातात दोन वर्षोची चिमुरडी ही हवेत उडून बोनेटवर जाऊन आदळली तरी देखील तिला सुदैवाने मार लागलेले नाहीÞ घटना घडतातच चार चाकी वाहन चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला असून घटनास्थळी महामार्ग पोलीस निरीक्षक केंद्र, पोलीस कर्मचारी सचिन गुरसुडकर, होमगार्ड मधुकर राठोड आदींनी भेट देत प्राथमिक पंचनामा केला.