24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeपरभणीसेलूत गावठी पिस्टलसह काडतूस जप्त : दोघे जेरबंद

सेलूत गावठी पिस्टलसह काडतूस जप्त : दोघे जेरबंद

एकमत ऑनलाईन

परभणी : सेलू शहरातील गायत्री नगरातील दोघा संशयीत व्यक्तींची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टलसह काडतुसे व धारदास खंजीरे जप्त केली आहे.

सेलू शहरातील गायत्री नगरात करतारसिंग हत्यारसिंग टाक रा. इंदीरानगर कळमनुरी व आनंद दगडू डोले रा. गायत्री नगर सेलू यांच्याकडे शस्त्र असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. यावरून पोलीस अधिक्षक जयंत मिना,अप्पर पो.अ.सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. प़्रविण मोरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, जमीरोद्दीन फारुखी, संजय घुगे, अरुण कांबळे,अरुण पांचाळ, हुसैन खान यांच्या पथकाने छापा टाकला या दोघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला अधीक चौकशी केली असता त्यांच्याकडे धारदार खंजीर, गावठी बनावट असलेले पिस्टल व तीन काडतूस मिळून आले. तसेच दोन मोबाईल असा एकून तीस हजाराचा मुद्ेमाल जप्त करून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात १९ तर ग्रामीणमध्ये १२१ कोरोना पॉझिटीव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या