28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home परभणी पोखर्णी येथे चक्काजाम आंदोलन

पोखर्णी येथे चक्काजाम आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोखर्णी फाटा येथे सुकाणू समितीच्या वतीने गुरूवारी दि.३ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर परभणी शहरातही शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलन करीत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी ३ नवे कृषी कायदे केले असून ते रद्द करावेत. हमी दराच्या कापसाची कठोर अंमलबजावणी करावी. देशात एमएसपीच्याखाली कोणत्याही शेतमालाच्या किंमती येऊ देवू नयेत. परभणी जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने तात्काळ सुरू करण्यात यावेत या व इतर मागण्यांसाठी पोखर्णी फाटा येथे कॉ.विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता पोखर्णी फाटा येथे शेतक-यांनी चक्का जाम आंदोलन करीत दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाला दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. दोन दिवसांत दिल्ली आंदोलनातील मागण्या मान्य करून सरकरने तोंडगा न काढल्यास ५ डिसेंबर रोजी ग्रामीण भाग बंद करून शेतकरी आंदोलन तीव्र करतील असा ईशारा यावेळी देण्यात आला. चक्काजाम आंदोलनात मदनराव वाघ, नरहारी वाघ, शिवाजी सोनवने, परसराम रासवे, राम वैरागर, गणेश वाघ, व्यंकटी आव्हाड, अशोक साखरे, विष्णू मोगले, तुकाराम कानडे, गोविंद भांड, सुरेश कच्छवे, भास्कर कच्छवे, अर्जुन कच्छवे, अंकुश तवर, वैजनाथ कच्छवे, भास्कर खुपसे, नागेश वाघ, राजेभाऊ सुर्यवंशी, रामा गव्हाणे, शिवाजी बंदाले आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.

परभणी शहरातही शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करण्यात यावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

कोरोना लसीला गुन्हेगारी जगताकडून धोका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या