परभणी : तालुक्यातील पेडगाव येथील नाफेडमार्फत सुरू असणा-या शासकीय हरभरा खरेदी केंद्रावर शेतकरी आपला हरभरा घेवून विक्रीसाठी आले होतेÞ परंतु, खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या ठिकाणचे हमीभाव केंद्र तत्काळ सुरू करण्यासाठी या केंद्रासमोरच शेतक-यांनी चना विक्री आंदोलन केले.
पेडगाव येथील नाफेडच्या केंद्रावर गेल्या सहा दिवसांपासून हरभरा घेऊन आलेली वाहने एकाच ठिकाणी थांबली असून, शेतक-यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणास वैतागलेल्या शेतक-यांनी तात्काळ शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी हरभरा खरेदी केंद्रासमोरच चना- छोले विक्री आंदोलन केले. तसेच परभणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर चना-छोले आंदोलन केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, शेतकरी संघटनेचे माऊली कदम, नारायण देशमुख, सुनील खरवडे, अशोक कदम, अनंता कदम, बाळासाहेब देशमुख, आनंद हरकळ, माणिक खरवडे, शिवाजी मोहिते, शिवाजी देशमुख, राजेश लवंदे, ज्ञानेश्वर पुरी, प्रभाकर परमेश्वर पुरी, माणिक लवंदे, विष्णू प्रभाकर, कदम मस्के, देविदास कदम, बाबुराव कदम आदी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.