28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeपरभणीरामभक्तांद्वारे हनुमान चालीसाचे पठण

रामभक्तांद्वारे हनुमान चालीसाचे पठण

एकमत ऑनलाईन

परभणी : दर्श-पिठोरी अमावस्या पोळा व चातूर्मासाच्या पाश्र्­वभूमीवर शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी शेकडो रामभक्तांनी स्टेशन रोड भागातील श्री पेढा हनुमान मंदिरात एकत्र येवून सामूहिक श्री हनुमान चालीसाचे १४ वेळेस पठण केले.

पुण्यईश्­वरी कर्मात प्रत्येक हिंदु बांधवाने सहभागी होवून प्रभू श्री रामचंद्र व श्री हनुमंतरायांचे आशीर्वाद प्राप्त करुन देव-देश-धर्मातील तसेच प्रत्येकाच्या व्यक्तीगत आयुष्यातील असंख्य अडीअडचणी व संकटांवर मात करण्याकरीता आम्हा सर्व हिंदुंना शक्ती, युक्ती, बुध्दी अन बळ दे, अशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करण्याकरीता श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेने स्टेशन रस्त्यावरील श्री पेढा हनुमान मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री ०७.३० वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

त्यासाठी रामभक्तांनी एकत्रित यावे, असे आवाहन केले होते. त्यास शेकडो रामभक्तांनी प्रतिसाद दिला. शुक्रवारी रात्री शेकडो रामभक्तांनी एकत्रित येवून सामुहिकपणे श्री हनुमान चालीसाचे १४ वेळेस पठण केले. त्यामुळे या भागातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. जय श्री राम, जय जय श्री राम, पवनसुत हनुमान की जय या जयघोषाने हा परिसर दणाणून गेला. दरम्यान, हा उपक्रम महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला साजरा होणार असल्याची माहिती श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या