20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeपरभणीजिंतूरात दुर्गादेवी विसर्जनाला गालबोट

जिंतूरात दुर्गादेवी विसर्जनाला गालबोट

एकमत ऑनलाईन

जिंतूर : शहरात दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत डी जे समोर नाचण्या वरून तरुणांच्या दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले यात दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले असून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच यातील सात आरोपीना ताब्यात घेतले ही घटना गुरुवार दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबत कृष्णा संजय आनंदे यनआ दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की गुरुवार दि ६ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली ही विसर्जन मिरवणूक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्थानका समोरील कृष्णा ज्वेलर्स दुकानासमोर आली असता एकता दुर्गा देवी मंडळाचे सदस्य डीजे च्या तालावर नाचत होते या वेळी मिरवणूकित शेहजान सिद्दीकी व संतोष टाक हे दोघे आले नाचण्यावरून त्याची कृष्णा आनंदे, मयूर फाले याच्या सोबत बाचाबाची झाली. त्यात शेहजान याने त्याच्या जवळील फायटरने मयूर फाले व कृष्णा यास मारहाण केली त्यात ते जखमी झाले.

त्यांना उपचाराला ग्रामीण रुग्णालयात नेट असताना रुग्णालयासमोर निजाम सिद्दीकी, सुलेमान सिद्दीकी व इतर तिघांनी मिळून पुन्हा मारहाण केली या बाबत शेहजान सिद्दीकी,संतोष टाक, निजाम काजी, सुलेमान काजी इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्रीच पोलिसांनि तिघांना ताब्यात घेतले तर शेहजान सिद्दीकी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की तो त्याचा मित्र संतोष टाक या सोबत मिरवणूक पाहत असताना काही मित्रांनी त्यास नाचण्याचा आग्रह केला.

त्यामुळे ते नाचत असताना कृष्णा आनंदे, महेश बारहते, रवी कुलथे, मयूर फाले, कृष्णा कुलथे, मयूर चांदजकर, विजय कुलथे, राजू कुलथे, संजय आनंदे यांनी या दोघांना तुम्ही आमच्या मंडळात येऊन का नाचत आहात या कारणावरून फायटर व लोखंडी रॉड ने मारहाण केली यात शेहजान सिद्दीकी हा जखमी झाला या बाबत वरील नऊ जणांविरुद्ध जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार जणांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफने,पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमनालकर, कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व जमावास पांगवले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या