24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीजन्मदात्या आईचा खून करणा-या मुलाला पोलीस कोठडी

जन्मदात्या आईचा खून करणा-या मुलाला पोलीस कोठडी

एकमत ऑनलाईन

पूर्णा : तालुक्यातील मौजे पिंपरण येथे जन्मदात्या आईच्या खून प्रकरणी चुडावा पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवत मुलाला अटक केली होती़ घर विक्रीस अडसर ठरत असल्याने आईचा काटा काढल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीस न्यायालयात हजर केले असता ०३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील मौजे पिंपरण येथे एका वृद्ध महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनि़शिवप्रकाश मुळे यांनी आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचा-यांना घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वृध्द महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आपले तपासाचे चक्र फिरविल्याने खून झालेली महिला पिंपरण गावातील सुलचनाबाई शंकर सोनटक्के (वय ६९)असल्याचे स्पष्ट झाले होते़ हा खून स्वत:चा मुलानेच दगड, विटाने मारहाण करून केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी मुलगा मारोती शंकर सोनटक्के यास शोध घेऊन अटक केली़

दरम्यान घर विकण्यास अडसर ठरत असल्याने मारोतीने आपल्या आईला जिवे मारून काटा काढल्याची फिर्याद गजानन नागनाथ सोनटक्के यांनी चुडावा पोलीस ठाण्यात दिल्याने आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मारोती सोनटक्के यास दि़२२ सप्टेंबर रोजी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने ०३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासातच खुनातील आरोपीचा छडा लावण्यात यश मिळवल्याने या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या