25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home परभणी शहरातील नागरिकांनी रॅपीड टेस्ट करून घ्यावी : आयुक्त पवार

शहरातील नागरिकांनी रॅपीड टेस्ट करून घ्यावी : आयुक्त पवार

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी दिनांक 4 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 15 केंद्रावर रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे 70 व्यापा-यांची तपासणी करण्यात आली. त्यात 66 जण निगेटीव्ह तर 4 जण पॉझिटीव्ह आढळले.
शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 16 केंद्रावर रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणीत करण्यात येत आहे. खोकला,सर्दी,ताप,घशात काही त्रास असेल तर तात्काळ सेंटरवर जावून तपासणी करावी.

तसेच शहरातील खासगी हॉस्पीटल डॉक्टरांनी ताप,सर्दी, खोकला आदी लक्षणे असलेले रुग्ण आल्यास त्यांना तात्काळ रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टसाठी सेंटरवर पाठवावे. सेंटरवर रोज सकाळी 10 ते 5 या वेळेत तपासणी करण्यात आहे.शहरातील व्यापारी, ऑटोरिक्षा चालक, खासगी प्रवाशी वाहतूक वाहनचालक यांनी तात्काळ रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करावी. ऑटोरिक्षाचालक व खासगी वाहनचालक विविध ठिकाणी प्रवाशी वाहतुक करीत असतात. प्रवाशाच्या आरोग्यासाठी कोव्हिड-19 पासून प्रतिबंध ठेवणे आवश्यक आहे.

शहरातील 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या असलेल्या व ज्यांना पुर्वीपासून विविध आजार आहेत. तसेच दमा, उच्चरक्तदाब, निमोनिया,मधुमेह, हदयविकार आदी संबंधी आजार असतील अशा नागरिकांनी ताप, खोकला या आजाराची लक्षणे दिसताच तात्काळ सेंटरवर जावून रॅपीड टेस्ट करून घ्यावे. शहरात कोरोना विषाणु प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधीत उपाययोजना करून प्रशासन व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे. शहरातील सीटी क्लब येथे निरंक, औषधी भवन येथे निरंक, आयएमए हॉल येथे 18 जणांची तपासणी करण्यात आली.

तेथे एक पॉझिटीव्ह सापडला. जागृती मंगल कार्यालयात निरंक,बाल विद्या मंदिर येथे 17 जणांची तपासणी केली.नुतन विद्यालयात निरंक,अपना कॉर्नर येथे निरंक, कोठारी कॉम्प्लेक्स निरंक, आरोग्य केंद्र साखला प्लॉट 8 जणांची तपासणी करण्यात आली. खानापूर आरोग्य केंद्रात 7 जणांची तपासणी करण्यात आली. 1 जण पॉझिटीव्ह आढळले. आरोग्य केंद्र खंडोबा बाजार येथे 9 जणांची तपासणी करण्यात आली.

जायकवाडी परिसरातील मनपा रुग्णालयात 9 जणांची तपासणी करण्यात आली. तेथे 2 जण पॉझिटीव्ह आढळले.इनायत नगर आरोग्य केंद्रात निरंक,कृषी उत्पन्न बाजार समिती 2 जणांची तपासणी करण्यात आली. बॅडमिंटन हॉल येथे निरंक संख्या आहे. या कामी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, संतोष वाघमारे, शिवाजी सरनाईक, समन्वयक गजानन जाधव, नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत.

सदस्यांचा विरोध, तरीही कोट्यावधीच्या कामांना मंजुरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या