22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीनागरीकांनी लसीकरणाचा डोस पूर्ण करावा

नागरीकांनी लसीकरणाचा डोस पूर्ण करावा

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
कोरोनाची संभाव्य चौथी लाट तसेच सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेवून जिल्ह्यातील नागरीकांनी लसीकरणाचा डोस पूर्ण करावा. व्यवहार करतेवेळी मास्क वापरावा. तसेच वारंवार साबणाने हात धुवून कुठेही वावरताना सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौ.आंचल गोयल यांनी केले आहे.

कोरोना साथीच्या पाश्‍र्वभूमीवर दि.१६ जानेवारी २०२१ पासून प्रतीबंधात्मक उपाय योजना म्हणून टप्प्याटप्प्यामध्ये विविध वयोगटात लसीकरणाचा समावेश करण्यात आला. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये १८ वर्षावरील लाभार्थीचे उद्दिष्ट १५ लाख ३५ हजार २०५ असून आजतागायत १२ लाख ३० हजार ६६८ म्हणजे ८० टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस तर ०९ लाख ३७ हजार ३३२ म्हणजे केवळ ६१ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे. तर १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभाथीर्चे उद्दिष्ट ०१ लाख ०१ हजार ८०५ असून आजतागायत ६१ हजार ९४० म्हणजे ६१ टक्के लाभाथीने पहिला तर ३३ हजार १९८ म्हणजे केवळ ३३ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे. १६ मार्च २०२२ रोजी पासून १२ ते १४ वर्ष वयोगटामध्ये लसीकरणाला सुरवात करण्यात आलेली आहे. या वयोगटातील लाभार्थीचे उद्दिष्ट ६५ हजार ८०४ असून आजतागायत २१ हजार २४८ म्हणजे ३२ टक्के लाभार्थ्यांना पहिला तर ०१ हजार २२९ म्हणजे ०२ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

सध्यस्थितीत उपरोक्त विविध गटामध्ये दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थीची संख्या ०३ लाख ३२ हजार ४११ असून संभाव्य चौथी लाट लक्षात घेता सर्वांनी आपला देय असलेला दुसरा डोस तसेच विविध वयोगटातील लाभार्थ्यांनी पहिला डोस तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर व ६० वर्षावरील प्रिकॉशन डोस देय असलेल्या लाभार्थीची संख्या ९५ हजार ८९५ असून हेल्थकेअर वर्कर व फ्रंटलाइन वर्कर यांना दुसरा डोस घेऊन ०९ महिने किंवा ३९ आठवडे झाल्यानंतर कोविडचा धोका सर्वात जास्त असल्याने तसेच हा गट सेवा देत असताना संभाव्य आजाराचा प्रसार करणारा असल्यामुळे या गटातील पात्र अधिकारी-कर्मचारी यांनी तसेच ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांमध्ये कोविड-१९मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पात्र जेष्ठ नागरिकांनी तत्काळ आपला प्रिकॉशन डोस पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसिकारणासोबतच मास्क वापरणे, वारंवार साबणाने हात धुणे तसेच सामाजिक अंतर ठेवणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या