34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeपरभणीनागरिकांनी नियम पाळावेत अन्यथा लॉकडाऊन

नागरिकांनी नियम पाळावेत अन्यथा लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाची नागरिकांनी कठोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी दुपारी एका पत्रकाद्वारे दिला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुढील काळात नागरिकांनी स्वंयम् शिस्तीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यामध्ये तोंडाला मास्क लावणे, आस्थापना, दुकानात सॅनेटायझर व सामाजिक अंतरांचे पालन करावे. नागरिक, आस्थापना, व्यापारी दुकाने यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. मुगळीकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

जिल्हयातील कोरोना संसर्ग फैलू नये यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारी म्हणून इतरही प्रतिबंधात्मक उपाययोजनात धार्मिकस्थळे, आठवडी बाजार, विदर्भात जाणारी प्रवासी वाहतुकीवर ७ मार्चपर्यंत निर्बंध लादण्यात आले आहेत. या शिवाय वरीष्ठ महाविद्यालयासह खासगी कोचींग क्लासेसही १ ते ४ मार्च दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय शाळाही बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच न्विनामास्क वावरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतू वरील उपाययोजना करूनही बाजारातील व सावर्जनिक ठिकाणी होणारी गर्दी पाहता शासनाने ठरवून दिलेल्या त्रिसुत्री ज्यात मास्क वापरणे, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतर याचे पालन होत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.

पुढील काळात नागरिकांनी स्वयंम शिस्तीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनात मास्क, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायइेर व सामाजिक अंतर याचे पालन न केल्यास प्रशासनास नाईलाजाने लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे श्री. मुगळीकर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. प्रशासनाच्या आवाहनास सर्व जण प्रतिसाद देतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे.

५ हेक्टर ५५ आर गायराण जमीन शेतक-यांच्या नावावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या