23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणी  कारेगाव रस्त्यावरील नागरीकांचे चिखलात बसून आंदोलन

  कारेगाव रस्त्यावरील नागरीकांचे चिखलात बसून आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी :शहरातील वॉर्ड क्रमांक १५ मधील रस्ते, नालंच्या दुरावस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी काय नाली, काय रोड, काय वार्डची अवस्था, सगळ ओके मधी हाय अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला़ तसेच यावेळी चक्क रोडवर झालेल्या चिखलात बसून आंदोलन केले़.

परभणी शहरातील कारेगाव रोडवरील वॉर्ड क्रमांक १५ मधील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून समस्यांचा सामना करावा लागत आहे़ महानगरपालिका घरपट्टी, नळपट्टी वेळेवर वसूल करतात़ पण रोड, नाल्याची झालेली दुरवस्था याकडे लक्ष देत नसल्याने नागरीकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ .

वारंवार निवेदने देऊनही महापालिका किंवा कोणताही नगरसेवक याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप यावेळी नागरीकांनी केला.

विद्यार्थ्यांना, महिलांना येजा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ या सर्व त्रासास कंटाळलेल्या कारेगावरोड, तिरुपतीनगर व परिसरातील संतप्त नागरिकांनी नगरसेवक व महापालिकेचा निषेध काय नाली, काय रोड, काय वार्डची अवस्था, सगळ ओके मधी हाय अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.

तसेच रस्त्यावरील चिखलात बसून जोरदार घोषणाबाजी केली़ या वेळी ऋषी सावंत, विश्वजित काटकर, रोहन राठोड, धनंजय जाधव, धम्मपाल कांबळे, संतोष रेवनवार आदीसह परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या