24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीचांदज येथे पोळ्याच्या बैल मिरवणुकीवरून हाणामारी, पाच जखमी

चांदज येथे पोळ्याच्या बैल मिरवणुकीवरून हाणामारी, पाच जखमी

एकमत ऑनलाईन

कौसडी : बोरी पोलीस ठाण्या हद्दीत असलेल्या चांदज येथे पोळा सणानिमित्त बैल मिरवणुकीवरून दोन गटात तुबळ हाणामारी झालीÞ यावेळी झालेल्या दगडफेकीत चार ते पाच जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिÞ२६ रोजी सायंकाळी ०५ वाजता घडलीÞ यात दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीस पाठवण्यात आले आहेÞ या दगडफेक प्रकरणी एकूण २० ते २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेÞ याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालीÞ.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ंिजतूर तालुक्यातील चांदज येथे पोळ्याच्या सणानिमित्त गावातून बैलाची मिरवणूक काढण्यात आली होतीÞ ही मिरवणूक संपल्यानंतर दोन गटात शिविगाळ सुरु झालीÞ याचे रूपांतर भांडणात झालेÞ त्यानंतर दोन्ही गटाकडून दगड, विटकरींचा मारा करण्यात आलाÞ यामध्ये एकूण ०४ ते ०५ जण जखमी झाल्याची घटना घडलीÞ या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या गणेश साहेबराव अंभुरे व बालासाहेब पाराजी अंभुरे या दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागला होताÞ या दोघांवर बोरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहेÞ या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांनी तातडीने चांदज येथे भेट देऊन परीस्थिती नियंत्रणात आणलीÞ तसेच सद्यस्थितीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहेÞ सध्या गावातील परीस्थिती नियंत्रणात असून शांतता आहेÞू

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या