परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूभार्वाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वेळोवेळी सूचना दिल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी उल्लंघण करताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.23) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरत बाजारपेठेची पाहणी करीत दंडात्मक कारवाई केली. स्वत: जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याचे पाहून अनेकांनी कोरोनाच्या उपाययोजनाची तात्काळ अंमलबजावणी केली. दरम्यान जिल्हाधिकारी बाजारपेठेतून स्वत: पाहणी करीत असल्याने बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे पथक मंगळवारी सकाळ पासून बाजारपेठांमधुन कारवाई करीत आहेत. विशेषत: या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर काही वेळातच जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर हे स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी शहरातील आरआर टॉवर, गांधीपार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रोड आदि परिसरात पायी चालत पाहणी केली. यावेळी श्री.मुगळीकर यांच्यासह पथकाने काही वाहनधारकांना समज दिली. तसेच काहींना दंडही ठोठावण्यात आला. व्यापा-यांना मास्क वापरण्यासह सॅनिटायझर व्यवस्था तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. श्री. मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ताफ्याने व्यापारी पेठांमध्ये मोठी खळबळ उडाली. पथकाच्या धास्तीने अनेक वाहनधारकांनी पटापट तोंडावर मास्क चढवले. तसेच दुकानांमधील काऊंटवर सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवण्यात आल्या. या कारवाईने बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
अन्वयार्थ माजी सरन्यायाधीशांच्या टिप्पणीचा