25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeपरभणीआ. बोर्डीकर यांचा आदिवासी पाड्यात जाऊन जल्लोष

आ. बोर्डीकर यांचा आदिवासी पाड्यात जाऊन जल्लोष

एकमत ऑनलाईन

जिंतूर : देशाच्या सर्वोच्च पदी महामहीम राष्ट्रपती निवड पहिल्या आदिवासी महीलेची होणे हे बलाढ्य लोकशाही देशासाठी भूषण व अभिमानस्पद क्षण असल्याची प्रतिक्रिया आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली.

राष्ट्रपती निवडीची घोषणा होताच आ. मेघना बोर्डीकर यांनी तालुक्यातील आदिवासीची संख्या असलेल्या केहाळ, मांडवा ईटोली आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत आदिवासी बांधवा समवेत निवडीचा फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंद साजरा केला. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना मुर्मु यांचा भरघोस अशा या फरकाने विजय झाल्याचे त्या म्हणाल्या. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना १३० कोटी जनता असलेल्या देशाने या ऐतिहासिक विजयाने इतिहास रचला असे प्रतिपादन करून सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचणा-या त्या दुस-या महिला राष्ट्रपती आहेत.

त्यांच्याकडून त्यांच्या कारकीर्दीत घटनात्मक मूल्याची जोपासना निश्चितच केली जाईल असा विश्वास ही आ. बोर्डीकर यांनी व्यक्त केला. श्रीमती द्रोपदी मुर्मु यांचे सेवाभावी जीवन त्यांचा संघर्ष देशाला दिशा देणारा आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भेटी दरम्यान लक्ष्मणराव बुधवंत माजी जि.प.अध्यक्ष सखाराम जवादे,केशव घुले, संदीप घुगे,सुनील घुगे,संजय घुले, राजेंद्र थिटे,भगवानराव जगताप,दत्ता माघाडे,नारायण कोकाटे,सुरेश शेळके,विश्वनाथ अंभुरे,आदींची उपस्थिती होती.

जिंतूर तालुक्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमानात असून द्रौपदी मुर्मु यांची निवडीची घोषणा होताच तालुक्यातील कान्हा,ब्राह्मणगाव,कुराडी सावरगाव, कोरवाडी,करंजी,अंबरवाडी,कवठा बदनापूर,हिवरखेडा,केहाळ,माणकेश्वर इटोली,मांडवा घेवंडा,डोंगरतळा, दाभा गडदगव्हाण,वाडी,भुसकवडी दगडवाडी,श्रीरामवाडी,आडगाव (बाजार) सोरजा, वरुड (नरसिंह) वडाळी,साखरतळा, मालेगाव,पिंपराळा, चिंचोली,भोसी,जोगवाडा व जिंतूर आदी ठिकाणी या निवडीचे आदिवासी बांधवा तर्फे ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय साजरा केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या