24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeपरभणीपुरग्रस्त भागातील नागरिकांना सुविधा देण्याचे आयुक्तांचे आदेश

पुरग्रस्त भागातील नागरिकांना सुविधा देण्याचे आयुक्तांचे आदेश

एकमत ऑनलाईन

परभणी : पुरग्रस्त भागातील नागरीकांच्या जेवनाची, शुध्द पाण्याची व्यवस्था करुन परिसराची स्वच्छता करण्यासह नाल्यालगत, धोकादायक इमारतीतील नागरीकांना नोटीसा देऊन सुरक्षीत स्थळी हलवण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापालीका आयुक्त देविदास पवार यांनी सहायक आयुक्तांना दिले आहेत. शहरात पिंगळगडनाल्याला पुर आल्याने सोमवारी गंगाखेड रोडवरील बाबर कॉलनी, क्रांती नगर, मंत्रीनगर आदी भागात नागरीकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे महापालीकेने उपाययोजना म्हणून कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मंगळवारी महापालीका आयुक्त देविदास पवार यांनी प्रभाग समिती अ,ब,क यांच्या सहायक आयुक्तांना आदेश दिले आहे.

त्यानुसार शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरीकांच्या घरात पाणी शिरले होते. ज्यामूळे नागरीकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांचा परिसर स्वच्छ करावा, जंतूनाशक औषधांची फवारणी करावी, धुर फवारणी करावी, नागरीकांना जेवण व शुद्ध पाणी उपलब्ध करुन द्यावेत असे आदेश दिले आहेत.तसेच येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामूळे शहरातील सखल भागातील, खदान परिसरातील, नाल्यांच्या शेजारी असणा-या नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी जाऊन नागरीकांच्या घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची वित्त व जिवित हानी होऊ नये या करीता मोठ्या नाल्यांवरील, नाल्या शेजारील नागरिकांना,मोडकळीस आलेल्या इमारत मालकांना नोटीस देऊन सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत होण्याचे कळवावे.

तसेच पावसाचे पाणी नाल्यांमधुन वाहून जाण्यासाठी स्वच्छता निरिक्षक यांच्या मार्फत प्रभाग समिती क्षेत्रातील नाल्यावरील ओटे, फरश्या काढून घ्याव्यात. प्रभाग समिती स्तरावर आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणासाठी पथक नेमावेत. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रभाग समितीतील सर्व कर्मचा-यांना मुख्यालयी उपस्थित ठेवावे. सहायक आयुक्त यांनी एकमेकांशी व शहर अभियंता विभाग, पाणी पुरवठा व यांत्रिकी विभाग, अग्निशमन, स्वच्छता, विद्यूत, आरोग्य विभाग, भांडार विभाग, स्वच्छता निरिक्षक यांच्याशी समन्वय ठेवुन आपत्कालीन परिस्थितीशी एकत्रीत पणे उपाययोजना कराव्यात अशा सुचना आयुक्तांनी केल्या आहेत.

डेल्टा व्हेरिएंटपासून बचाव अत्यंत आवश्यक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या