24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीग्रामीण भागात मुलभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध : आ. डॉ. राहूल पाटील

ग्रामीण भागात मुलभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध : आ. डॉ. राहूल पाटील

एकमत ऑनलाईन

परभणी : ग्रामीण भागात गेल्या ८ वर्षात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देत मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली. या पुढेही ग्रामीण भागात रस्ते, नाली, पथदिवे आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आ. डॉ. राहूल पाटील यांनी सांगितले.

परभणी विधानसभा मतदारसंघातील मिरखेल व तट्टूजवळा येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा बुधवार, दि. १५ जून रोजी आ. पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. भूमीपूजन पार पडलेल्या सभामंडपासाठी २५ लक्ष रुपये, सी.सी.रोड व नाली बांधकामासाठी २५ लक्ष रुपये निधी आ. पाटील यांच्या २५/१५ निधी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

याप्रसंगी मिरखेल येथे राम महाराज, शिवसेना नेते रवींद्र पतंगे, कृ.उ.बा.संचालक सोपान अवचार, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अरविंद देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती भानुदासराव डुबे, युवासेना तालुका प्रमुख संदीप झाडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदाशिव देशमुख, माजी सरपंच बाळासाहेब डुकरे, मोईन पटेल, नागेशराव देशमुख, युवासेना शाखा प्रमुख शरद देशमुख, शिवसेना शाखा प्रमुख पांडुरंग देशमुख, राम घोलप व ग्रामस्थ उपस्थित होते.

तर मातोश्री पाणंद रस्ता योजनेंतर्गत तट्टुजवळा येथे ४५ लक्ष रूपयांच्या निधीतून पांदण रस्ता तयार करण्यात आला आहे. या पाणंद रस्त्याचा लोकार्पण सोहळा आ.डॉ. पाटील यांच्या हस्ते पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून हा पाणंद रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार आ. पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या