16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeपरभणीसोफियातील स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या खेळाडूंचा सत्कार

सोफियातील स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या खेळाडूंचा सत्कार

एकमत ऑनलाईन

परभणी : युरोपमधील एफआयजी फेडरेशनद्वारा बलगिरिया येथील सोफिया येथे दि Þ१७, १८, १९ नोव्हेंबरला ३६ वे जिम्नॅस्टिक ट्रंपोलियन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेÞ या स्पर्धेत परभणीतील शेख जुनेद व रमण सिंगितम यांनी सहभाग नोंदवला होताÞ हे खेळाडू परभणी येथे परतले असता त्यांचा सत्कार करण्यात आलाÞ.

या स्पर्धेत भारताने पहिल्यांदा सहभाग नोंदविला होता. परभणीतील या दोन खेळाडूंनी विदेशातील स्पर्धेत सहभाग नोंदवणे ही परभणीसाठी अभिमानाची बाब आहे. हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून आल्यानंतर परभणीतील जनसेवक एसÞ केŸगौस व बादल भैया मित्र मंडळ यांच्या वतीने शेख जुनेद, रमण सिंगितम या खेळाडूचे व त्यांचे प्रशिक्षक प्रदीप लटपटे यांचा आय.टी.आय. ग्राउंड येथे सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा प्रेमी इक्बाल, रशीद मास्टर, बशीर, लटपटे, सलीम भाई, एसŸकेŸगौस, गफार मास्टर, समाजसेवक बादल सय्यद अनीस तरोडेकर, जमीर, आनीस, अजिज कुरेशी, रफीक साहारा डीजीटल, इमरान, आजर, मुन्ना आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या