परभणी : अदानी समुहातील आर्थिक गैरकारभार संदर्भातील हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्यात यावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश यांच्या नियंत्रणाखाली चौकशी करावी अशी मागणी परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने एलआयसी व एसबीआय समोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे की, अदानी समुहातील आर्थिक गैरकारभार संदर्भातील हिंडेनबर्ग जाहीर केला आहे. या अहवालाची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे. या मागणीसाठी सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी एलआयसी व एसबीआयसमोर आंदोलन करण्यात आलेÞ या आंदोलनात आमदार सुरेश वरपूडकर, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, बाळासाहेब देशमुख, रामभाऊ घाडगे, सुहास पंडित, तुकाराम साठे आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेÞ यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होता.