22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeपरभणीइंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

एकमत ऑनलाईन

परभणी : पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या किंमती भरमसाठ वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. गॅसच्या किंमती हजाराच्या आसपास पोहचल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. वारंवार होणा-या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी दि.०७ रोजी परभणी शहर व जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. भिकुलाल पेट्रोल पंपासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भिकुलाल पेट्रोल पंपासमोर जोरदार निदर्शने करीत केंद्र सरकार विरोधी घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होता. वारंवार इंधन दरवाढ होत असल्याने याचा वाहतुकीवर परिणाम होत असून परिणामी बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तुंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून याचा निषेध नोंदवण्यात आला.

विनाकारण श्रेयवाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या