23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home परभणी कोरोनामुळे निराधाराची उपासमार, क्राय व संकल्प संस्था बनली आधार

कोरोनामुळे निराधाराची उपासमार, क्राय व संकल्प संस्था बनली आधार

परभणी : मागील पाच महिण्या पासून करोनाची महामारी सुरु झाली अन लॉक डाऊनमुळे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची उपासमार सुरु झाली. या गर्तीत शेतमजूर, स्थालातरीत कुटुंब, बारा बलुतेदार, छोटे शेतकरी, छोटे व्यवसायिक सापडले, त्यातही भूमिहीन गरीब निराधारांची वाईट दैना झाली ज्यामध्ये विधवा, परीतक्ता, अपंग, वृद्ध, आजाराने ग्रस्त असणा-या व्यक्ती यांच्याकडे दुर्लक्ष झाले.

संकल्प मानव विकास संस्थेच्या लक्षात हि बाब आल्यामुळे परभणी व जालना जिल्ह्यातील एकूण ८० गावात प्रत्येक्ष ग्रहभेटी देऊन निराधाराचे सर्वेक्षण केले आणि एकूण ६०० हून अधिक निराधार कुटुंबाना किमान दोन महिने पुरेल इतके धान्य व किरणा सामानचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये ३० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ किलो दाळ, २ किलो साखर, २ किलो तेल व सोयाबीन वडीचे पॉकेट वाटप करण्यात आले. यामुळे ६०० कुटुंबातील १८०० ते २००० व्यक्तींना किमान दोन महिन्यासाठी धान्याचा आधार मिळाला.

महाराष्ट्रात मार्च महिन्यात लॉक डाऊन सुरु झाले, यामुळे उसतोड मजूर, वीट भट्टी मजूर, बांधकाम मजूर तसेच पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या सारख्या महानगतातून स्थलांतरित कुटुंब परत आपल्या गावी परत आले.त्यामुळे करोनाला प्रतिबंध करण्यासाठी क्राय व संकल्प संस्थेने 5942 कुटुंब, 1412 किशोरी यांना स्वच्छता व संरक्षणाचे साहित्य वाटप केले. ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला १५ साबण, ७५० मिली हँड वॉश, सॅनिटरी पॅड, सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले त्याच प्रमाणे करोना नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहे त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे म्हणून परभणी आणि जालना जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्राचे १६३ अधिकारी कमर्चारी, ३३ केंद्राचे ६९ अधिकारी कमर्चारी, १२३ अंगणवाडीताई, १०३ आशा, १३४ सफाई कामगार, २०३ पोलीस अधिकारी, कमर्चारी, ५९ पत्रकार यांना संरक्षण कीट वाटप करण्यात आले.

Read More  अण्णाभाऊंना भारतरत्नच्या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow