गंगाखेड : शहरात कोरोनाचे संक्रमणाने पुन्हा वेग घेतला आसून पोलिस ठाण्यातील तीन अधिका-यांसह तीन कमर्चारी कोरोना पाँझिटिव्ह आल्याने खबदारीचा उपाय म्हणुन सर्वच पोलिस कर्मचा-यांची तपासणी करण्यात येत आहे पोलिस ठाण्याचे कामकाज इमारतीचा बाहेरील जागेतून सुरू करण्यात आले आहे तर नगराध्यक्ष कोरोना पाँझेटिव्ह आल्याने संपूर्ण नगर परिषद कंन्टेमेन्ट झोन करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गा पासून दुर आसलेल्या गंगाखेड शहरात कोरोनाचा शिरकाव लग्न सभारंभाचा कार्यक्रमातुन झाला होता यावर आरोग्य विभागाचा अविरत प्रयत्नाने कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आसतानाच दि.९ रोजी पोलिस ठाण्यातील तीन अधिका-यांसह तीन पोलिस कमर्चारी अँन्टि रँपीड टेस्ट मध्ये कोरोना बाधित आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन पोलिस निरिक्षक वाय.एन.शेख यांनी संपूर्ण पोलिस कर्मचा-यांची कोरोना तपासणी करण्याचे काम हाती घेत पोलिस ठाण्याचे कामकाज इमारत बाहेरील जागेतुन सोशल डिस्टशिंग ठेऊन सुरू करण्यात आले आहे.
मागील सहा महिण्या पासून कोरोना संक्रमणापासून पोलिस ठाणे चार हात दुरच होते पण अखेर पोलिस ठाण्यातही कोरोनाने शिरकाव केलाच आहे. तर प्रकृती अस्वस्थेमुळे कोरोना तपासणीत नगराध्यक्ष कोरोना पाँझिटिव्ह आल्याने संपूर्ण नगर परिषद सील करण्यात आली आसून नगर परिषदेचा सर्वच अधिकारी कमर्चारी यांची आज पासून कोरोना तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.शहरात पुन्हा वेगाने कोरोनाचा संक्रमणास सुरूवात झाली आसल्याने नागरिकांनी काम असेल तरच घरा बाहेर येताना मास्क व सँनिटायझरचा वापर करावा विना कारण शहरात फिरू नये असे आवहान उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हेमंत मुंडे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल