23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeपरभणीदोन सख्या भावांचा कोरोणाने घेतला बळी : गंगाखेडात खळबळ

दोन सख्या भावांचा कोरोणाने घेतला बळी : गंगाखेडात खळबळ

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : लहान भावाचा मृत्यूचा दहाव्याचा विधी होत आसताना मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची बातमी येताच घरात एकच कल्लोळ निर्माण झाला अवघ्या दहा दिवसातच दोघा भावाचा कोरोनाने बळी घेतल्याचा घटनेने शहरात एकच खळबळ सह भितीचे वातावरण निर्माण झाले.कोरोना बाधित लहान भावाचा संपर्कात आल्याने मोठ्या भावाच ही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अवघ्या दहाव्या दिवशी मोठ्या भावाचाही आज रविवार रोजी मृत्यू झाल्याचा घटनेने संपूर्ण शहरात हळहळ सह भितीचे वातावरण निर्माण झाले तर स्वागत सभारंभातील शाही भोजनाने घात काढल्याची जोरदार चर्चा होत आहे.

शहरातील खडकपुरा गल्लीत राहणारे दोघा भावाचे पोष्ट ऑफीस जवळ असलेल्या रोडवर दोन रेशन दुकान असून लहान भाऊ अचानक निमोनियाने आजारी झाल्याने त्यास परभणी येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते उपचार सुरू आसताना निमोनिया आजार कमी होत नसल्याने अखेर कुंटुबियांनी त्यास औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले आसता या रूग्णालयाने त्याची करोना टेस्ट करण्यात आली आसता पाँझिटिव्ह आल्याने त्याचावर उपचार सुरू होते.

लहान भावाचा संपर्कात मोठा भाऊ आसल्याने त्याची ही करोना टेस्ट पाँझिटिव आल्याने दोघा भावावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते पण लहान भावाचा उपचार दरम्यान प्रकृती मध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांचा मृत्यू दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला. दहाव्याचा विधी आज रविवार रोजी होत आसताना मोठ्या भावाचा ही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी येताच घरात एकच कल्लोळ झाला.

अवघ्या दहा दिवसात संपूर्ण कुंटुबाचा भार आसलेल्या दोघा भावाचा करोनाने मृत्यू झाल्याने शहरात सर्वञ हळहळ व्यक्त होत आसून या घटनेने अनेकांना धक्काच बसला तर स्वागत सभारंभातील स्नेह भोजनाने घात काढल्याची चर्चा होत होती शांत स्वभाव आसलेल्या दोघाचे रेशन दुकान समोरा समोर आसून सर्व लाभार्थी यांना धान्य वाटपा नंतर ही एकमेव सुरू आसणारे रेशन दुकानात यांची गणना होते तर एकाच दुचाकीवर सातत्याने फिरणारे कोणत्याही कार्यक्रमास बाजारातही एकञ दिसणारे आसल्याने शहरात त्यांना दो हंसो का जोडा नावाने ओळखत आसल्याने दोघाचा मृत्यूने दो हंसो का जोडा बिछड गया रे म्हणण्याची वेळ आली आहे.

परभणी येथे कोरोना विषाणु संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोना विषाणु संसर्गावर उपचार घेणा-यांचा आकडा वाढत असून त्यामुळे जिल्हा प्रशासन या बाबतीत कडक धोरण अवलंबित आहे. गेल्या महिण्याभरापासून जिल्ह्यात दर शनिवार, रविवार संचारबंदी लागू करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरळीत बाजारपेठ सुरु झालेली आहे. परंतू शनिवार आणि रविवार या दोन दिवसात संचार बंदी लागू करण्यात आली होती.

१५ ऑगस्टपर्यत इ परवाने स्थगित-कोरोना विषाणुचा फैलाव जोरात होत असून त्यावर रोख मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना आखत आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी जिल्ह्यात येणा-्या व्यक्ती व वाहनांना देण्यात येणा-या ई पास स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या