परभणी : प्रतिनिधी
‘कोरोना’ विषाणूची लागण झाली आहे की नाही ? याची तपासणी आता परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केली जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा, सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे परभणी येथे कोरोना संशयीत आढळल्यास त्याचा वैद्यकीय अहवाल काही तासातच मिळणार आहे. ही परभणीकरांचा त्यामुळे खर्च आणि विलंब टळणार आहे.
गेल्या दीड दोन महिन्यांपासून येथील जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा तालुका ठीकाणच्या रुग्णालयातून संशयित अशा रुग्णांचे स्वॅब घेतले जात होते. येथून ते पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेच्या प्रयोगशाळेकडे खास वाहनाद्वारे पाठविल्या जात होते. दोन-तीन दिवस तेथील त्या स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा करावी लागत होती. या प्रक्रियेत मोठा विलंब, खर्च सुध्दा होत होता.आरोग्य विभागाने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेतून सुविधा उपलब्ध केल्यानंतर पुण्याऐवजी येथून औरंगाबादला संशयित रुग्णांचे स्बॅव पाठविल्या जात होते. त्यासाठी सुध्दा दोन दिवस प्रतिक्षा करावी लागत. या दरम्यान, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेत स्वॅबच्या चाचण्यां सुरु झाल्या. त्यामुळे एकदीड दिवसांतच संशयीत अशा रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त होवू लागले.
Read More महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलावली बैठक, लॉकडाऊनबाबत चर्चा होणार ?
पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांची मदत या पाश्र्वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातच कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबच्या चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. रुग्णालयातील काही यंत्र तसेच येथील शिसोदिया पॅथॉलॉजीने उपलब्ध केलेल्या मशिनरीमुळेच हे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांच्या मदतीने तयारी सुरू केली आहे. टेस्टिंगचे कामही तातडीने सुरू जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या संशयीत रुग्णांच्या स्वॅबच्या चाचणीची सुविधा उपलब्ध झाल्या बरोबर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने त्यांच्याकडील काही स्वॅब तपासणी करिता परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे ट्रायल स्वरूपात टेस्टिंगसाठी पाठविले असून त्या स्वॅबच्या चाचणासंबंधीचं काम सुध्दा शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आले. त्यासाठी नागपूर येथील एम्सने हिरवा कंदील दाखविला असून या टेस्टींगच्या प्रक्रियेतील रिझल्टनंतरच आरोग्य विभागाद्वारे त्यास रितसर परवानगी मिळेल. अशी माहिती मिळाली.