26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home परभणी परभणी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

परभणी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ आज जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला. कोविड सेंटरमधील भूलतज्ञ डॉ.दुगार्दास पांडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी स्वत: ही लस सर्व प्रथम घेऊन परभणी जिल्हावासियांमध्ये नवा विश्वास निर्माण केल्याच्या भावना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

मागील दीडवषार्पासून कोविड-19 मुळे जी सर्वस्तरावर अस्वस्थता होती त्या अस्वस्थेला आजच्या लसीकरण शुभारंभामुळे पूर्णविराम मिळाला. ज्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात कोविड-19 बाधितांवर उपचार केले त्या आपल्या सर्व आरोग्य सेवकांपासून या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीमती फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे व आरोग्य विभागाची टिम या ऐतिहासिक शुभारंभास उपस्थित होती.जिल्ह्यातील सुमारे 10 हजार 800 सेवकांची, रक्षकांची नोंदणी या लसीकरणासाठी झाली असून जिल्ह्यात 4 ठिकाणी लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. आज प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे एकुण 400 लसीकरणाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नोंदणी कक्ष, निरीक्षण कक्ष व लसीकरण कक्ष अशा तीन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम नोंदणी करून लसीकरण कक्षात प्रवेश दिला जाईल. त्यानंतर लसीकरण केल्यानंतर जवळपास 30 मिनिटे त्या उमेदवारास निरीक्षण कक्षात तज्ञ वैद्यकीय अधिक-यांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

प्रारंभी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणाची सुरुवात करुन संवाद साधला. याबाबतचे थेट प्रक्षेपण संगणकीय पडद्यावर आरोग्य कर्मचा-यांनी पाहिले. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, डॉ.डाके, डॉ.खंदारे, डॉ.धूतमल यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

अनिवासी भारतीयांची संख्या १.८ कोटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या