30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीकोरोना बाधितावर अंत्यसंस्कार करीत घडवले माणुसकीचे दर्शन

कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार करीत घडवले माणुसकीचे दर्शन

एकमत ऑनलाईन

सेलू : युथ फोरम व जमात ए इस्लामी हिंदच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेत हिंदू धर्मीय कोरोनाबाधितावर मंगळवार दि.13 रोजी अंत्यसंस्कार करीत मुस्लीम युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवले. सेलू येथील येथील 85 वर्षीय महिलेस दोन दिवसापुर्वि कोरोना झाला होता.त्यांच्या परिवारातील जवळचे येथे कोणीच नव्हते, त्यांचे नातू कामासाठी पुण्याला आहे. उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात आधी दाखल केले. त्यानंतर सेलूच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जवळचे नातेवाईक उपलब्ध नाही, शासकीय यंत्रणेने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला असल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न समोर राहिला. कोरोनाबाधित असल्याने अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा या कठी प्रसमगी धमार्बाद येथे प्राध्यापक म्हणुन कार्यरत असलेले शहाब यांच्यीश संपर्क केला असता त्यांनी ताबडतोब येथील युथ फोरम व जमात ए इस्लामी हिंद युथ विंगला संपर्क करुन संबधित मयत महिले बाबत कल्पना दिली. युथ फोरमचे व जमात ए इस्लामी हिंदचे शेख साजीद, सिद्दिकी मोईन, डॉ. मुताहेर खान, शोहेब हाश्मी, करीम खान, दाऊद खान हे ताबडतोब सेलूत दाखल झाले. त्यांनी नातेवाईकाला सोबत घेत स्वत: पुर्ण सोपस्कर करुन त्या कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार केले. शेख साजीद, सिद्दिकी मोईन, डॉ. मुताहेर, शोहेब हाश्मी, करीम खान, दाऊद खान या युवकांनी माणुसकीचे दर्शन घडलिल्याने सर्वत्र त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.

ना परीक्षा ना अभ्यास विद्यार्थी थेट पास; मात्र गुणवत्तेवर परिणाम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या