26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home परभणी मनपाचे 92 कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत; कर्मचा-यांत आनंदोत्सव

मनपाचे 92 कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत; कर्मचा-यांत आनंदोत्सव

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी महापालिकेतील वर्ग तीन व चार संवर्गातील 92 कर्मचा-यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला़ आहे़ यामुळे कर्मचा-यांनी आनंदोत्सवसाजरा केला. परभणी महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी गेल्या 20 वर्षांपासून काम करीत आहेत़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे़ तसेच यासाठी सार्वजनि बांधकाम मंत्री अशोकराजी चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अमित विलासराव देशमुख, आमदार सुरेश वरपुडकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, नगरविकास सचिव महेश पाठक, कक्ष अधिकारी प्रदीप पाटील, आयुक्त देवीदास पवार आदींनी पुढाकार घेतला होता.

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने 28 मार्च 2018 रोजी महानगरपालिकेतील मंजूर असलेल्या रिक्त पदावर सेवेत नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला होता. तसेच शासन पत्र दिनांक 12 डिसेंबर 2018 नुसार शासनाकडून प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील विविध नगरपरिषद, नागरपंचायतीमधील 11 मार्च 1993 ते 27 मार्च 2000 या कालावधीत नियुक्त होऊन सध्या कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचार्‍यांचा सेवेत नियमित करण्याचे धोरण संदर्भ शासन परभणी शासन परभणी शहर महापालिकेच्या 28 मार्च 2018 च्या प्रस्तावानुसार महानगर पालिकेतील रोजंदारी कर्मचारी वर्ग 3, वर्ग 4 च्या 92 कर्मचार्‍यांचे परभणी शहर महानगरपालिकेतील रिक्त पदावर नियमित समावेशन करण्याबाबतचे आदेश डी. 14 जानेवारी 2021 जा.कर. प.म पा./प्र. क 280/न वी 24 मंत्रालय मुंबई .कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांनी आदेश काढले आहेत़

कसिनो जुगार अड्ड्यावर धाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या