30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home परभणी १८ हजार हेक्टरवरील कापूस प्रश्न ऐरणीवर

१८ हजार हेक्टरवरील कापूस प्रश्न ऐरणीवर

एकमत ऑनलाईन

सोनपेठ (सिद्धेश्वर गिरी) : यावर्षी तालुक्यात तब्ब १८ हजार हे्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. परंतू कापूस खरेदीसाठी एकही शासकीय केंद्र सुरू नसल्याने खाजगी व्यापारी शेतक-यांची अडवणूक करीत आहेत. खाजगी व्यापा-यांकडून ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रूपयांचर दर कापसाला दिला जात आहे. व्यापारी कवडीमोल दराने कापूस खरेदी करीत तालुक्यातील कापूस प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरीत आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि मूग हातचा गेल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतक-यांची कापसावर मदार आहे. मात्र शेतक-यांच्या वेळेचा कापूस खरेदी करणारे व्यापारी गैरफायदा घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.कडता,आडत,हमाली आणि एका भावात ठरवलेला कापूस परत भाव बदलून दिला जात असल्याने आता या व्यापार संकटाला शेतक-यांना तोंड द्यावे लागत आहे.तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात शेतक-यांनी तब्बल १८००० हेक्टरवर कापसाची लागवड केली आहे.मात्र शेतक-यांना न्याय देण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र म्हणून उल्लेख असणा-या सीसीआय, फेडरेशन सोनपेठ तालुक्यात कुठेही सुरू नसल्याने शेतक-यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून संघर्ष करुन कवडीमोल दराने आपल्या कापसाची विक्री करावी लागत आहे. याचा गैरफायदा व्यापारी घेत असल्याने व्यापार युनियन सोकावली असल्याचे चित्र सोनपेठमध्ये दिसून येत आहे.

मागील अनेक दिवसांपासून सोनपेठमध्ये खाजगी व्यापा-यांनी शेतक-यांची आर्थिक पिळवणूक सुरु केली आहे. त्यामुळे शेतक-यांना व्यापारी वर्गास तोंड देतांना नाकीनऊ येत आहेत. शेतक-यांचा त्रास कमी करण्यासाठी फेडरेशन आणि सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. नुकत्याच कापूस पिकास लागलेल्या बोंडअळीने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळवले असल्याने सद्यस्थितीत शेतक-यांची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. त्यातच कवडीमोल दराने खाजगी व्यापा-यांनी कापूस खरेदी सुरु केल्याने निराशात्मक वातावरण निर्माण केले आहे. ग्रामीण भागातून सोनपेठ शहरात कापूस मोठ्या अपेक्षेने शेतकरी आणतात. मात्र या शेतक-यांची खाजगी व्यापारी मोठ्या प्रमाणात लुट करत असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे. सोनपेठ तालुक्यात ग्रामीण भागात देखील खाजगी व्यापा-यांनी कापूस उत्पादक शेतक-यांच्या नशीबी नाकीनऊ आणले आहेत. मागील वर्षी तब्बल ५ हजार २०० रुपये क्विंटली असणारा कापूस यावर्षी मात्र कवडीमोल दराने ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० दराने विक्री केला जात आहे. त्यामुळे शेतक-याचे पार हवालदिल झाला आहे.

व्यापा-यांकडून वाहनचालकांना कमिशनचे अमिष
ग्रामीण भागातून सोनपेठ शहरात कापूस मोठ्या अपेक्षेने शेतकरी आणतात. मात्र या शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी खाजगी व्यापारी स्पर्धेने धावतात. आपल्याच प्रतिष्ठानात कापूस आणावा, या करीता खाजगी अ‍ॅटो व टमटम चालकांना प्रति क्विंटल १०० प्रमाणे कमीशन देतात. त्यामुळे अ‍ॅटोचालक खाजगी कापूस खरेदीदारांकडेच कापूस कसा नेता येईल, यासाठी प्रयत्न करतात. त्याच बरोबर कापूस खरेदीदारांकडून कडती, आडत, हमालीच्या नावाखाली ३० ते ४० रुपये क्विंटलामागे कडती कापत असल्याने शेतक-यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अमेरिकेने तिबेटप्रश्नी चीनला डिवचले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या