27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपरभणीविठ्ठलवाडी शिवारात पुरात वाहून गेल्याने गायीचा मृत्यू

विठ्ठलवाडी शिवारात पुरात वाहून गेल्याने गायीचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : मरडसगाव तलाठी सज्जा अंतर्गत येणाऱ्या विठ्ठलवाडी येथे पुरात वाहून गेल्याने बुधवारी एका गाईचा मृत्यू झाला. या घटनेने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.

विठ्ठलवाडी येथील दीपक सीताराम वाघमोडे यांची गाय गावाजवळच्या ओढ्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेली. बुधवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी एकत्र येत मेलेल्या गाईस पाण्याच्या बाहेर काढले.

त्यानंतर मल्हार लोखंडे यांनी ही बाब आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली. एकूणच गायीच्या मृत्यूले ग्रामस्थ हळहळ व्यक्त केली जात आहे .सखाराम बोबडे पडेगावकर मसनेरवाडीचे माजी सरपंच जयदेव मिसे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ पंचनामा करावा अशी विनंती केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या