30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home परभणी अवैध दारू विक्री करणा-या सहा जणांविरूध्द गुन्हा नोंद

अवैध दारू विक्री करणा-या सहा जणांविरूध्द गुन्हा नोंद

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हयाला अवैध धंद्याच्या कचाटीतुन मुक्त करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून एकापाठोपाठ एक कारवाई सुरू आहेत. परभणी, जिंतूर, पालम, पिंपळदरी, पुर्णा पाठोपाठ या पथकाने दैठणा व पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळपासूनच छापेमारी करीत देशी, विदेशी दारूसह हातभट्टी असा १ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ६ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात नव्याने रूजू झालेले जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना व अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पवार, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे , नीलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहूल चिंचाने, विष्णु भिसे, दिपक मुदिराज, अजहर पटेल यांनी शनिवारी दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सिंगणापुर जवळील साखर कारखाना परिसरातील देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

या माहितीवरून पथकाने कारखाना परिसरातील एका शेतामध्ये अवैध दारु विक्री करत असलेल्या एका दारु अड्ड्यावर छापा टाकला यावेळी त्यांना पांढ-या रंगाच्या पिशवीत ३५ देशी व ८ विदेशी दारुच्या बाटल्या तसेच ४ प्लास्टीक टाक्यामध्ये गुळ मिश्रीत दारु तयार करण्याचे सडके ८०० लीटर रसायन, एक मोटारसायकल व एक जणं आढळून आला. कारखाना परिसरात १० वाजण्याच्या सुमारास आणखी एक जणं पिशवीतुन देशी दारुच्या ४८ बाटल्या मोटारसायकल बाजुला लाऊन विकत होता. त्यास ताब्यात घेऊन दोन्ही प्रकरणातील देशी, विदेशी हातभट्टी दारु दोन मोटारसायकल असा १ लाख ५१६ रुपयांचा मुद्देमाल दैठणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस अमंलदार पुर्णा विष्णु बालासाहेब भिसे यांनी दिलेल्या फियार्दीवरून आरोपी कृष्णा आत्माराम गायकवाड रा.स्वच्छता कॉलनी वांगी रोड परभणी व चंद्रकात नारायण कांबळे सिंगणापुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने जिल्ह्यातील पाथरी शहरात सायंकाळच्या सुमारास माहीती गोळा करुन ड्रायडेच्या दिवशी अवैध देशी-विदेशी दारु विक्री करण्याच्या उद्देशाने जमा करुन ठेवलेल्या अवैध देशी दारुच्या ६९३ बॉटलसह १३९ बॉटल विदेशी दारु व ४० लिटर हातभट्टी दारू असा एकंदर ६२ हजार ३७४ रुपयांचा मुद्देमाल व ४ आरोपी विरुद्ध पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दीड लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनप्रश्नी चर्चा व्हायला हवी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या