सेलू प्रतिनिधी : सेलू तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नूकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. तालूक्यात सोमवारी रात्री ११ वाजेच्या सूमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामूळे गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले तर कापणी केलेल्या हरभरा पिकांच्या गंजीवरील ताडपत्र्या वा-यामूळे उडून गेल्याने हरभरा पिकांच्या गंजी भिजल्या आहेत.
अगोदरच मेटाकूटीस आलेल्या शेतक-यांना असा निसर्गााच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. हरभरा, गहू ,ज्वारी पिकांना अगोदरच उतारा कमी येत असताना असा असमानी सकटांचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे.
एकीकडे सरकार मोठ्या प्रमाणात खत, रसायनिक औषधी, बियाणे यांच्या किंमतीत वाढ करत आहे. मात्र शेती मालास कमी भाव असल्याने शेती करणे परवडत नसून त्यामध्ये असा आस्मानी व सूलतानी संकटाचा सामना शेतक-यांना करावा लागत असून शासनस्तरावरून मदत मिळण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.