29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeपरभणीबांधावरचा जाळ, उभ्या झाडांचा कर्दनकाळ

बांधावरचा जाळ, उभ्या झाडांचा कर्दनकाळ

एकमत ऑनलाईन

चारठाणा : उन्हाळ्याच्या दिवसांत बांधावरील वाळलेले गवत जाळण्यासाठी लावली जाणारी आग मात्र बांधावरच्या उभ्या झाडांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. केवळ झाडेच नाही तर जैवविविधतेची सुद्धा मोठी हानी यानिमित्ताने होत असते परंतु आपल्याच विश्वात मग्न माणसाला मात्र याचे काहीच सोयर सुतक दिसून येत नाही.

जिंतूर तालुक्यातील चारठाणासह परिसरात पावसाळ्यात शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात हिरवे गवत उगवत असते. जनावरांना त्याचा चारा होतो म्हणून शेतकरी ते सांभाळतोही पण अर्धवट खाल्लेलं गवत उन्हाळ्यात मात्र अडचण वाटू लागते, तसेच गवत जाळलं तर पुढच्या वर्षी चांगले गवत उगवते या गैरसमजातून अनेक शेतकरी आपापल्या बांधावरचे वाळलेले गवत पेटवून देतात.

मात्र हे गवत पेटवत असताना शेताच्या बांधावर उभी असलेली झाडे सुद्धा ह्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात याच थोडही सोयरसुतक शेतक-यांना नसतं. बांधावर केवळ झाडेच नाही तर गवताळ प्रदेशावर अवलंबून असलेले अनेक किटक, सरीसृप, तर गवताळ व डोंगराळ भागात अधिवास असणारे, प्रजनन करून पुढची पिढी जन्माला घालणारे अनेक पक्षी, जैवसाखळीत महत्वाची भूमिका निभावणारे अनेक घटक या आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असतात. अनेक पर्यावरणप्रेमी वन्यजीवप्रेमी संस्था याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र गैरसमज आणि अज्ञानाने पछाडलेल्या एका मोठ्या वगार्पुढे ही जनजागृती अतिशय तोकडी पडते.

केवळ बांधावरील झाडेच नाही तर आजूबाजूच्या परिसरात पसरलेली ही आग इतर मोठ – मोठी झाडे, कधी कधी अनेक शेतक-यांचाच संसार सुद्धा उध्वस्त करत असते. उन्हाळ्याच्या दिवसात जंगल परिसरात लागणारा वणवा असो वा आपल्या भोवताल बांधावरील पेटवलेले गवत असोसिएशन जैवविविधतेची होणारी हानी मात्र कधीच भरून न निघणारी आहे.

निर्वासित रोहिंग्यांना परत पाठवले जाऊ शकते; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या