26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeपरभणीझरीत वादळी वा-याने सोलार पंपाचे नुकसान

झरीत वादळी वा-याने सोलार पंपाचे नुकसान

एकमत ऑनलाईन

झरी : परभणी तालुक्यातील झरी, पिंपळा, वाडी दमई यासह जिल्ह्यातील अनेक भागांना सोमवारी रात्री वादळी वा-यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. या पहिल्याच पावसाने शेतक-यांची दाणादाण उडवली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी तालुक्यातील अनेक भागांत वादळी वा-यासह पाउस झाला. अनेक ठिकाणी सोलार पंपांचे मोठे नुकसान झाले. वाडी दमई शिवारात सुधाकर रामभाऊ तवटे यांच्या गट क्रमांक ५९ मधील शेतातील सोलार पॅनेल वा-याने उखडून पडला. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. हंगामी पूर्व कपाशी लागवड सुरू असताना सौर पंपाचे नुकसान झाल्याने या शेतक-यापुढे संकट निर्माण झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या