30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home परभणी कोरोना रूग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ : प्रशासनाचे दुर्लक्ष

कोरोना रूग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ : प्रशासनाचे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : शहरातील कोरोना बाधित रूग्णास कोव्हिड रूग्णालयात दाखल करून उपचार केले जातात पण कोरोना रूग्णाचा जवळून संपर्कात येणा-या कुंटुबातील व्यक्तीच्या कोरोना टेस्ट कडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कोरोना रूग्णाचा संपर्कातील व्यक्ती मुक्तपणे संचार करीत आसल्याने कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

शहरात मागील काही दिवसापासून कोरोना रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे.शहरातील बाजार पेठेत सोशल डिस्टशिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसत आसून कोणत्याही दुकानावर शासनाचा नियमास व्यापा-यानी हारताळ फासल्याचे दिसुन येत आहे.तर काही व्यापा-यानी चक्क साडी महासेल सुरू करून कोरोनास निमंत्रणच दिले आहे.यास नागरिक हि तेवढेच जवाबदार आसल्याचे दिसुन येत आहे.

सभारंभाचा कार्यक्रमातुन कोरोनाचा शिरकाव शहरात झाल्याचे आरोप प्रत्यारोपाचा खेळ रंगला पण आरोग्य विभागाचा डॉक्टरानी अहोराञ प्रयत्न करून कोरोना रूग्ण संख्या अटोक्यात आणली पण अनलाँक चार मध्ये शासनाने बहुतांशी बाजारपेठ खुली केल्याने शहरात पुन्हा कोरोना संख्येत झपाट्याने वाढ झाली.गेल्या दोन चार दिवसां पासून संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.बुधवारी, गुरुवार पाठोपाठ शुक्रवारी शनिवार रोजी सुध्दा कोरोना बाधित आढळून आले त्यात काही व्यापारी, काही कमर्चा‍र्यांचा समावेश आहे.

गंगाखेड पोलिस ठाण्या पाठोपाठ गंगाखेड नगर पालिका कार्यालय सुध्दा महसूल प्रशासनाने या पाश्वर्भूमीवर महसूल प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. शहरासह तालुक्यात आतापर्यंत 407 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 319 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील कुंटुंबाचा कोरोना टेस्ट कडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने बाधिताचा संपर्कातील व्यक्ती मुक्तपणे संचार करीत आसल्याने शहरात कोरोनाचा उद्रेक झालेला दिसत आहे.प्रशासनाने बाधित कुंटुबातील व्यक्तीची टेस्ट करण्याची मागणी सर्वञ होताना दिसत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे तेरा बळी , 601 नवं बाधीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या