18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीदुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मानवत : सध्या दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहेत. मानवत येथे
दि . १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग ६१ जवळील शहरातील राघवेंद्र जिनिंग जवळ भगतसिंग नगरातील राहणारे रामकिसन सोनवणे वय ४५ वर्ष हे जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी गेले होते . रात्री ८ सुमारास मागून भरघाव आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेत रामकिसन सोनवणे गंभीर जखमी झाले होते.

त्यांना उपचारासाठी मानवत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता वैधकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी मृत घोषीत केले .

या आठवड्या ही दुसरी घटना आहे. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलिस नायक मुनू शेख , नारायण सोळंके करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या