19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeपरभणीमानवत येथील बाळंतीनीसह नवजात अर्भकाचा मृत्यू

मानवत येथील बाळंतीनीसह नवजात अर्भकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मानवत : येथील एका २५ वर्षीय महिलेला प्रसूती नंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने उपचारासाठी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. परंतू या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून या महिलेने जन्म दिलेल्या बाळाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मानवत येथील कोक्कर कॉलनी परिसरात राहणा-या सरस्वती बालाजी गिराम वय अंदाजे २५ वर्ष या महिलेला १७ सप्टेंबर रोजी दुस-या बाळंतपणसाठी सकाळी शहरातील खाजगी रुग्णलायात नेण्यात आले होते. या ठिकाणी प्रसूतीचे प्रयत्न करण्यात आले परंतु परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच खाजगी डॉक्टरांनी त्या महिलेस मानवत ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दुपारी ११.४० वाजता पाठवले. दरम्यान सदर महिला वाहनामध्येच अर्धवट परिस्थितीत प्रसूती झाली होती.

त्यानंतर प्रसूती पूर्ण झाल्यानंतर या महिलेला जास्त प्रमाणात रक्त स्त्राव होत असल्याचे सांगण्यात आले होते.त्यानंतर ३.४५ वाजता परभणी येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. परंतु परभणी येथील रुग्णालयात या महिलेवर उपचार होत नसल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. या सर्व घटनात बराच वेळ प्रवासात गेल्याने आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या महिलेने प्रसूती दरम्यान बाळाला जन्म दिला होता परंतु या बाळाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

स्त्री, बालरोग विशेषतज्ञ असूनही घडली घटना
मानवत शहरातील ग्रामीण रुग्णलाय येथे २ स्त्री रुग्ण विशेषतज्ञ अधिकारी व १ बालरोग तज्ज्ञ अधिकारी आहेत. तरी देखील प्रसूती झालेल्या मातेला पुढील उपचारासाठी अन्यत्र पाठवावे लागते व बालकाचा मृत्यू होतो ही बाब अंत्यत गंभीर स्वरूपाची आहे. केंद्र व राज्य शासन गरोदर माता व बालक यांच्या सुरक्षित उपचारासाठी फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासह खर्च करीत असतात. तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारे मातेवर उपचार न होणे व बालकाचा मृत्यू हे शासकीय आरोग्य प्रशासनाच्या कार्यप्रणाली स्तराबाबत सर्वसामान्यांना विचार करायला लावणारी घटना आहे.

खाजगी डॉक्टरने पाठवला होता रूग्ण : डॉ.जाधव
मानवत रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.जे. जाधव यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरील प्रसूतीचा रुग्ण ग्रामीण रुग्णालयात शहरातील खाजगी डॉक्टरने पाठवला होता.रुग्ण दवाखान्यात आला त्यावेळी प्रसूतीची प्रक्रिया अर्धवट झालेली होती. त्यामुळे सदर प्रसूती सुरळीत करून बाळ वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यात यश आले नाही. सदरील महिलेला प्रसूतीनतर जास्त रक्तस्राव सुरू होता. त्यामुळे या रुग्णाला रक्ताची नितांत गरज होती. आपल्याकडे रक्त उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथील सामान्य रुग्णालयात रुग्णाला पाठवावे लागले असे सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या