परभणी : परभणी-जिंतूर महामार्गावरील चांदज पांगरी शिवार अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यापुर्वी या महामार्गावर अपघातात अनेक वन्यप्राण्यांनी जीव गमावला आहे. वन विभागाने वन्य प्राण्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
परभणी-जिंतूर महामार्गावर गुरूवार, दि. २५ मे रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत वनविभागाच्या वतीने घटनास्थळी कोणी आले नव्हते किंवा या बाबत कुठली नोंद ही करण्यात आली नव्हती. दुर्मिळ होत असलेल्या या वन्य प्रान्याच्या सुरक्षेसाठी काही तरी उपाय योजना वनविभागाच्या वतीने करण्यात याव्या अशी मागणी सर्वसामान्य नागरीकातून होत आहे.