28.4 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeपरभणीपरभणी बाहयवळण रस्त्याची निविदा प्रक्रिया नव्याने करण्याची मागणी

परभणी बाहयवळण रस्त्याची निविदा प्रक्रिया नव्याने करण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील बाहयवळण रस्ता निर्मितीची ४३० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया अंतिम होत अहमदाबाद येथील मेÞसरस्वती कन्स्ट्रंक्शन कंपनी यांना सदर काम मिळाले आहेÞ तथापी या कंपनीची बिलो ३१Þ२ टक्के निविदा ही स्वीकारली असून ४३० कोटीच्या कामांसाठी केवळ २९६ कोटी एवढ्या किमतीत अंतिम झालेली ही निविदा पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची आणि पर्यायाने परभणीकंराची थट्टा करणारी आहेÞ त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत निर्माण झालेल्या रस्त्यांचा आढावा घेवून परभणी बा वळण रस्त्यांकरिता मंजूर निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा एकदा कठोर नियम आणि अटीसह दुसरी निविदा प्रक्रिया अंतिम करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे महानगर जिल्हा प्रमुख प्रविण देशमुख यांनी केली आहे.

यापूर्वीच जीडीसीएल या मुंबई स्थित कंपनीने बिलो २२ टक्के या न परवडणा-या किंमतीने कोल्हा- झिरो-नसरतपुर (राष्ट्रीय मार्ग ६१) या महामार्गाचे वाट लावली आहेÞ तर दुसरीकडे बिलो ११ टक्केने परभणी- गंगाखेड रोडची (राष्ट्रीय मार्ग ७५२ के) काम पूर्णत्वास येण्याआधीच रोजचीच दुरुस्ती, रोजचीच तक्रार सुरू आहे. जिंतूर- परभणी असो वा गंगाखेड-परळी सातत्याने जिल्ह्याच्या बाबतीत ही नकारात्मकता पाहण्यास मिळत आहेÞ या परिस्थितीवर मार्ग काढणे अत्यंत आवश्यक झाले आहेÞ अबनॉर्मल बिलो निविदा प्रक्रिया आणि ठेकेदारांची हाराकिरी यामध्ये जिल्हा आणि पर्यायाने नेतेमंडळी बदनाम होत असल्याचे देशमुख यांनी गडकरी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

परभणी शहरातील ८९ अपघाती मृत्यूस कारणीभूत वसमत रस्त्यास पयार्यी वळण रस्त्याच्या ८ वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आपण निधी मंजूर करत भूसंपादनासह एकूण ४९६ कोटी मंजूर केले आहेत.Þ यामध्ये ४३० कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष रस्ते कामाचा अंतर्भाव असून ३१.२ टक्के म्हणजे १३४ कोटी एवढ्या कमीकिंमतीने मेÞसरस्वती कन्स्ट्रंक्शनने निविदा मिळवताना जे जस्टिफिकेशन किंवा या किमतीमध्ये काम करण्याचा आराखडा सादर केला असेल आणी तो राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाने स्विकार केला असेल तर या ठिकाणी १३४ कोटी अर्थात ३१.२ टक्के एवढ्या वाढीस जबाबदार अधिका-यांना निलंबित किंवा बडतर्फ केले पाहिजे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लावणा-या ठेकेदारांवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे अथवा वानगी दाखल परभणी वळण रस्त्याच्या १३४ कोटींच्या वाढीस जबाबदार अधिका-यांवर कारवाई आवश्यक आहेÞ यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आजपर्यंत निर्माण केलेल्या रस्त्यांचा आढावा घेत परभणी बा वळण रस्त्यांकरिता मंजूर निविदा प्रक्रिया रद्द करावी आणि पुन्हा एकदा कठोर नियम आणि अटींसह दुसरी निविदा प्रक्रिया अंतिम करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गट महानगर जिल्हा प्रमुख प्रविण देशमुख यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या