22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeपरभणीकोरोना चाचणी जुन्याच पध्दतीने करण्याची मागणी

कोरोना चाचणी जुन्याच पध्दतीने करण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हा प्रशासन व महानगर पालीकेच्या शिक्षकांच्या वतीने ़घरोघरी जावून नागरिकांची कोरोना चाचणी लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहीती मनपाकडून देण्यात आली आहे. सदरील चाचणी ही रॅपीड ट्ेस्टद्वारे कऱण्यात येणार असून ही पध्दत योग्य नाही ही चाचणी जुनीच पध्दत वापरून स्वॅब पध्दतीनेच करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जिल्हाभरात रॅपीड टेस्टच्या माध्यमातून चाचण्या सुरु केल्या जात आहे परंतू जे अधिकारी,कर्मचारी नागरिकांच्या चाचण्या करतील आधी त्यांचीच चाचणी करणे गरजेचे आहे. महानगर पालीकेचे आयुक्त व कर्मचाºयांच्या आधी रॅपीड टेस्ट करायला पाहीजे तरच नागरिकांना या रॅपीट ट्ेस्टवर विश्वास बसेल कारण या रॅपीट टेस्टमुळे अनेकजण कोरोना पॉझीटीव्ह निघत आहेत काही दिवसानंतर पुन्हा निगेटीव्ह होत आहेत परंतू या काळात त्यांच्या घरातील व परीसरातील नागरिक धास्ती घेत आहे. वयोवृध्दांना तर जास्त धोका असल्याचे बोलले जात आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केलीे. रॅपीड टेस्टची मान्यता मिळालेली आहे. आपलं रक्त घेऊन अवघ्या पाच मिनिटात संबंधित संशयित रुग्णाला कोरोनाची लागण झाली की नाही हे समजू शकणार आहे.
यापुर्वी कोरोना चाचणीसाठी स्वॅब टेस्ट – कापसाच्या आधारे गळ्यातून किंवा नाकातून स्वॅब सँपल घेऊन चाचणीसाठी पाठवले जाते., नेझल अ‍ॅस्पिरेट: विषाणूची चाचणी करणारी लॅब नाकात एक सोल्यूशन टाकून सॅम्पल कलेक्ट करते., ट्रेशल अ‍ॅस्पिरेट : ब्रोंकोस्कोप नावाची एक लहानशी ट्यूब घशावाटे टाकून सॅम्पल घेतले जाते आणि त्याची चाचणी होते., सप्टम टेस्ट: फुफ्फुसातील जमा टिश्यू नाकावाटे घेऊन त्याचं सॅम्पल टेस्ट होतं., रक्त चाचणी : रक्ताचा नमूना तपासणीसाठी पाठवला जातो.

रॅपीड टेस्टमध्ये आपलं रक्त घेतलं जातं. यातून अवघ्या पाच मिनिटात आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का हे समजू शकतं. यावरून तुम्हाला कोरोनाची लागण झालीये का नाही हे निदान करण्यासाठी होऊ शकतो.

जिल्हा रुग्णालयातआरोग्य सुविधेंचा अभाव
जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्घ होत नाहीत अपुरे कर्मचारी ़वैद्यकीय अधिकारी यामुळे उत्तम क्वालीटीचे ट्रिटमेंट मिळत नाही.
परवा आॅक्सीजन नसल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.
सध्या कोरोना वार्डात अपुरे कर्मचारी असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

Read More  कासाळ ओढ्याच्या कामामुळे कटफळ मध्ये हिरवाई बहरली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या