23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeपरभणीनांदेड- हुबळी रेल्वेचा गोवापर्यंत विस्तार करण्याची मागणी

नांदेड- हुबळी रेल्वेचा गोवापर्यंत विस्तार करण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

परभणी : नांदेड विभागातून दमरेने सुरू केलेल्या साप्तहिक नांदेड-हुबळी रेल्वेचा विस्तार गोवा पर्यंत करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. या बाबत महासंघाने एक निवेदन दमरेला पाठवले आहे.

या निवेदनात मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून मराठवाडा विभागातून गोवा, मंगळूर किंवा कन्याकुमारीपर्यंत जोडणा-या रेल्वेची सतत मागणी करण्यात येत आहे. या मागणीला अनुसरून दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने लोंढा जंक्शन येथे इंजिन बदलण्याची अडचण पुढे करून पंढरपूर मार्गाने गोवा ऐवजी नांदेड-हुबळी दरम्यान विशेष रेल्वे चालवली आहे.

काही दिवस प्रायोगिक तत्वावर चालवल्यानंतर नांदेड-हुबळी रेल्वेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता १३ ऑगस्टपासून नांदेड-हुबळी रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला असून पंढरपूर ऐवजी बीदर-गुंतकल-होसपेट मार्गे सोडण्याची घोषणा केली आहे. सदर रेल्वे मार्गाने गोवाकडे जाताना इंजिन बदलण्याची गरज नसून सध्या घोषित नांदेड-हुबळी रेल्वेचा हुबळीच्या पुढे गोवा/मंगळूर/कन्याकुमारी पर्यंत विस्तार करण्यात यावा. स्वातंर्त्याचा अमृत महोत्सव सुरू असताना मराठवाड्यातून गोवा/केरळ जाण्यासाठी अजूनही रेल्वे नाहीÞ त्यामुळे या गाडीचा विस्तार किमान गोवा पर्यंत करावा व सदर रेल्वेला कायमस्वरुपी करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी महासंघाने केली आहे.

नांदेड-हुबळी नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी
परळी-मिरज आणि मिरज-हुबळी या दोन्ही सवारी रेल्वे गाड्यांना एक्स्प्रेसमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहेत. तर दोन्ही रेल्वे गाड्यांना एकत्रित करून सदर रेल्वेला परळीच्या पुढे नांदेडपर्यंत विस्तार करून नांदेड-हुबळी दरम्यान कायमस्वरूपी नवीन दैनंदिन जलद रेल्वे सुरू करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्राÞसुरेश नाईकवाडे, डॉ.राजगोपाल कालानी, रवींद्र मूथा, श्रीकांत गडप्पा, रुस्तम कदम, कादरीलाला हाशमी, विठ्ठल काळे आदींनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या